लातूर जिल्ह्यात 12 जुलै रोजी 40 रुग्ण तर 11 जुलैच्या प्रलंबित मध्ये 18 रुग्ण पॉझेटिव्ह
सोमवार 13 जुलै,
लातूर जिल्ह्यात 12 जुलै रोजी 40 रुग्ण तर 11 जुलैच्या प्रलंबित मध्ये 18 रुग्ण पॉझेटिव्ह
आले असून एकूण 58 रुग्णाची नोंद झाली.
लातूर जिल्हा 15 जुलै ते 30 जुलै 20 पर्यंत लोकडाऊन
लातूर मध्ये
प्रकाश नगर, होळकर नगर, कोईल नगर, ड्रायव्हर कॉलनी, केशव नगर, भाग्यनगर, साळे गल्ली, अक्षरधाम कॉलोनी, कोल्हे नगर, भारत सोसायटी, झिगनाप्पा गल्ली, पंचवटी नगर येथील प्रत्यकी 01 रुग्णांची नोंद झाली आहे.
उदगीर 7, चाकूर 01, लातूर तालुका 23, निलंगा 04, रेणापूर 01, देवणी 04 येथील रुग्ण पॉझेटिव्ह आले आहेत
तर प्रलंबित 11जुलै रोजीचे रुग्ण - 18
लातूर 04, उदगीर 03, अहमदपूर 02, निलंगा 02, औसा 05 रुग्ण पॉझेटिव्ह आले आहेत
*१५ ते 30 जुलै दरम्यान लातूर जिल्ह्यात लोकडाऊन*
*पालकमंत्री ना. अमित*
*विलासराव देशमुख*
जिल्ह्यात अलीकडच्या काळात वाढत चाललेला कोविड१९ प्रादुर्भाव लक्षात घेता १५ जुलै पासून जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येत असल्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी घोषित केले आहे. या संदर्भातील लॉक डाउन कसे असेल यावर अधिक तपशील जिल्हाधिकारी जी. श्रीकांत सोमवार 13 जुलै रोजी जाहीर करतील.
अनलॉक २ च्या काळात बऱ्याच व्यवस्था सुरू झाल्या आहेत, मात्र या काळात रेडझोनमधून अनेक प्रवाशी जिल्ह्यात आले आहेत परिणामी कोविड१९ चा प्रादुर्भाव वाढला आहे, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही साखळी तोडणे आवश्यक बनले आहे .एकंदरीत परिस्तिथीतिचा विचार करता संभाव्य धोका टाळण्यासाठी लातूर जिल्ह्यात १५ ते 30 जुलै दरम्यान पुन्हा लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे पालकमंत्री ना अमित देशनमुख यांनी म्हंटले आहे, लॉकडाऊन मध्ये कोणत्या सुविधा कशा प्रकारे सुरू राहतील याचा तपशील जिल्हाधिकारी जी श्रीकांत आज 13 जुलै रोजी जाहीर करतील असे त्यांनी सांगितले.