परभणी : कोरोनाबाधीत 10रुग्ण आढळले
कोरोनाबाधीत 10रुग्ण आढळले
परभणी, दि.04(प्रतिनिधी)-
शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या आठवडाभरापासून दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. शुक्रवारी (दि.तीन) सायंकाळी कोरोनाबाधित एकूण 7 रूग्ण आढळून आल्या पाठोपाठ शनिवारी10 ऐवढे रूग्ण कोरोंनाबाधीत आढळले आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालयातून नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्रयोगशाळेस संशयितांचे स्वॅब पाठविण्यात आले होते. शुक्रवारी दुपारपर्यंत त्या प्रयोग शाळेत एकूण 48 स्वॅब प्रलंबीत होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास मेलद्वारे त्या स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले. त्यातून 6 एवढया संशयितांचा स्वॅब पॉझिटीव्ह आला.पाठोपाठ शनिवारी 10.व्यक्तींचा स्वॅब पाॅजिटिव्ह आला. त्यामुळे आता या जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या 139 एवढी झाली आहे.
दरम्यान, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग व महसुल विभागात दिवस्दिवस वाढणा-या रुग्णांच्या संख्येने मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळपासूनच प्रशासनाने एकूण स्थितीचा आढावा घेवून तीन दिवसीय संचारबंदी लागू केली. त्याद्वारे नागरी भागात सावधगिरीच्या उपयायोजना अवलंबिल्या आहेत. शहरासह जिल्ह्यात अन्य महानगरातून मोठ्या प्रमाणावर व्यक्ती व कुटुंबिय अधिकृत, अनाधिकृतपणे स्थलांतरीत होत असून त्यामुळेच जिल्हा महसुल, पोलिस प्रशासन चिंतेत सापडले आहे.