हिंगोली, आठ अधिकाऱ्यांची नियुक्ती, एकाच कक्षात मिळणार कोरोना रुग्णाची माहिती

जिल्हा परिषदेत आता जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना



हिंगोली - कोरोना बाधित रुग्णांची माहिती तातडीने एकाच कक्षात उपलब्ध व्हावी यासाठी आता जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात स्वतंत्र जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना गुरुवारी करण्यात आली असून या समितीत आठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या समितीचे जिल्हा समन्वयस्क म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत माळी यांच्याकडे जबादारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आता एकाच कक्षात संपूर्ण माहिती मिळणार आहे.


जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता. रुग्णाची सर्व माहिती एकाच कक्षात उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा यांच्या आदेशानुसार जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कोरोना बाधित रुग्णा साठी विविध यंत्रणेकडून होत असलेल्या कारवाहीची एकत्रित माहिती गोळा करून जिल्हास्तरावर या कक्षात उपलब्ध होणार असल्याचे 
धनवंत माळी यांनी सांगितले.


धनवंत कुमार माळी हे या गठीत केलेल्या नियंत्रण कक्षाचे समन्वयक असून यामध्ये पशुसंवर्धन अधिकारी डॉ, प्रवीनकुमार घुले, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, हे सदस्य असतील तर  यू. एल. हातमोडे, विस्तार अधिकारी राधेश्याम परांडकर ,सुनील गुट्ठे, अनिल केदार, कमलेश ईशी हे सहायक म्हणून काम पाहणार आहेत.कोरोना विषाणू संदर्भातील सर्व आदेश, संचिका,माहिती एकत्रित या कक्षात मिळणार असल्याने विषाणू प्रादुर्भावावर नियंत्रण मिळण्यास सोपे होणार आहे. दर दिवशी जमा केलेल्या रिपोर्टची माहिती वरिष्ठ अधिकारी यांना कळविली जाणार आहे.समितीतील अधिकारी, कर्मचारी हे साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात विविध यंत्रणेसोबत समन्वय साधणार आहेत. तसेच काही कोरोना बाबतीत समस्या असतील तर तातडीने नियंत्रण कक्षासी संपर्क साधावा असे आवाहन सीईओ राधाबीनोद शर्मा, जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले यांनी केले आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा