चिंताजनक ; क्वारंटाइन केलेल्या सात रुग्णांना कोरोनाची बाधा ,रुग्ण संख्या गेली ३७ वर 


चिंताजनक ; क्वारंटाइन केलेल्या सात रुग्णांना कोरोनाची बाधा ,रुग्ण संख्या गेली ३७ वर 


हिंगोलीने गाठले कोरोनाचे द्विशतक


हिंगोली - जिल्ह्यातील सेनगाव येथे मुंबई वरून परतलेल्या सात व्यक्तींना क्वारंटाइन केले होते. या सर्वांचे स्वाब अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आल्याचे अहवालावरून स्पस्ट झाले आहे. यामुळे रुग्ण संख्या ३७ वर गेली असली तरी कोरोनाने द्विशतक गाठले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुमार प्रसाद श्रीवास यांनी दिली आहे.


शनिवारी औंढा तालुक्यातील एका ३७ वर्षीय पुरुषाला औरंगाबाद येथे भरती करण्यात आले होते त्यास कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पस्ट झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जिल्ह्यात आतापार्यंत कोरोना रुग्णांनी द्विशतक आकडा पार केला असून, त्यापैकी १६३ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. आजघडीला ३७ रुग्णावर उपचार सुरू आहेत.


दरम्यान, वसमत कोरोना केअर सेंटर येथे भरती करण्यात आलेल्या रुग्णामध्ये हट्टा चार, गिरगाव दोन, अकोली एक, कुरुडवाडी एक, 
हयातनगर चार, कौठा एक, वसमत शहर एक, एकूण१४ रुग्णांचा समावेश आहे. या सर्वांची प्रकृती ठणठणीत असून कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत.तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात एकूण २२ रुग्णांना भरती करण्यात आले आहे. यात सुरेगाव एक, नागेश वाडी एक, पहेनी दोन,चोंढी खुर्द सहा, बाराशिव दोन, सेनगाव तीन रिसाला तीन, नगर परिषद हिंगोली चार, यांचा समावेश असून त्यांच्यावर वैद्यकीय पथकामार्फत उपचार सुरू आहेत.


 आयसोलेशन वॉर्ड व कोरोना सेंटर येथे आतापर्यन्त २४८४ व्यक्तींना भरती करण्यात आले होते. त्यापैकी २१३८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.२१९० रुग्णांना घरी सुट्टी देण्यात आली. सद्य स्थितीला २७५ व्यक्ती भरती असून,९७ रुग्णांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा