शांतीनगर भागात  सूक्ष्मजंतू आढळले ,परिसरात एकच खळबळ


शांतीनगर भागात  सूक्ष्मजंतू आढळले ,परिसरात एकच खळबळ


आरोग्य विभागसमोर संशोधन करण्याचे मोठे आव्हान


हिंगोली -   बळसोंड परीसरा लगत असलेल्या शांतीनगर भागातील पत्रकार नंदकिशोर कांबळे यांच्या घरासमोरील अंगणात नवीन जातीचे जंत, किडे गोगलगाय , सापासारखे, लांबलचक एकमेकांना घट्ट धरून घोळक्याने चालत जाणारे व नंतर तुटक तुटक रूप धारण करणारे सूक्ष्म जंतू  गुरुवारी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून यावर संशोधन करण्याचे  तगडे आव्हान आरोग्य विभागासमोर उभे आहे.


शांतीनगर भागात नंदकिशोर कांबळे यांचे घर असून , पहाटेच्या सुमारास घरातील मंडळी अंगण झाडत असताना नवीन सूक्ष्म जंतू आढळून आल्याने नगरातील अनेकांनी या सूक्ष्मजंतूची पाहणी केली असता हा जंतू पहिल्यांदाच पहिला असल्याचे नागरिकांनी सांगितले. एका वर्षापूर्वी टीव्हीवर या प्रकारचे जंतू आल्याचे काहीजणांनी सांगितले. 


 आरोग्य विभाग  व  कृषी विभागाच्या व तज्ञ व्यक्तींनी या नवीन सूक्ष्मजंतूंच्या शोध घेणे गरजेचे आहे, या जंतूचा 
मानव व प्राणी अन्य व्यक्तींना धोका तर उत्पन्न होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असल्याचेही  पाहणाऱ्या अनेक जणांनी सांगितले आहे. दरम्यान पत्रकार नंदकिशोर कांबळे यांना विचारले असता हे विषाणू व सूक्ष्मजंतू नवीनच पाहण्यात आले असून यापूर्वी जवळपास चाळीस वर्षात असे जंतू पाहण्याचे कधी निदर्शनास आले नाही. तसेच पंडित सुरोशे यांनी पाहणी केली असता ते म्हणाले की, या जंतूचा शोध लावून कोणत्या जातीचे जंतू निर्माण झाले हे गरजेचे आहे. एखाद्या तज्ञ व्यक्तीने प्रयोगशाळेत तपासणी करून निदान लावणे आवश्यक असल्याचेही पोलीस कॉन्स्टेबल पंडित सुरोशे यांनी सांगितले. हे सूक्ष्मजंतू  पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. 


अगोदरच कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे नागरिक घाबरत असताना आता पुन्हा हे कोणते नवीन सूक्ष्म जंतू सापडले असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.या सूक्ष्म जंतूंची पाहणी करण्यासाठी आरोग्य विभागाचा एकही अधिकारी ढुंकूनही पाहिला नाही, साधी भेट देखील देणे दूरच, हिंगोली जिल्ह्यात प्रथमच हे नवीन सूक्ष्म जंतू आढळून आल्याने यावर संशोधन करण्याचे तगडे आव्हान आरोग्य विभागसमोर आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा