लाच स्विकारणा-या उपव्यवस्थापकास अटक 

लाच स्विकारणा-या उपव्यवस्थापकास अटक 

परभणी, दि.22(प्रतिनिधी)-

 

येथील वीज वितरण कंपनीच्या मानव संसाधन विभागातील उपव्यवस्थापक प्रकाश सुधाकर टाक यांना दोन हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिका-यांनी सोमवारी(दि.22) मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. 

एका तक्रारकर्त्याने 12 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात स्वतः एक तक्रार दाखल केली. त्यातून आपण 28 वर्षाच्या सेवेनंतर उपकार्यकारी अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालो. त्याचे सेवानिवृत्तीनंतर मिळणारे क्लेम करिता संबंधीत कर्मचारी लाच मागत असल्याचे नमुद केले. या खात्याच्या अधिका-यांनी लगेच सापळा रचला अन् पंचासमक्ष वीज कंपनीच्या मानव संसाधन विभागात(क्रमांक 2) केलेल्या कारवाईत तक्रारकर्त्यांकडून उपव्यवस्थापक प्रकाश सुधाकर टाक हे दोन हजार रूपयांची लाच स्विकारतांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. 

दरम्यान, पोलिस निरीक्षक अमोल कडू, अनिल कटारे, अनिरूध्द कुलकर्णी, सचिन धबडगे, जमिल जहागीरदार, मिलिंद हनुमंते, शेख शकील, शेख मुखीद, माणिक चट्टे, सारिका टेहरे, रमेश चौधरी, जनार्दन कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा