हिंगोली :- ३०हजाराची लाच घेताना मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

३०हजाराची लाच घेताना मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात


हिंगोली- कळमनुरी मंडळामध्ये वाळूची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टवर कारवाई न करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी उत्तम डाखोरे याना हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (ता. ८ ) रोजी दुपारी कळमनुरी येथील बसस्थानका समोर रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले.


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी मंडळातील काही गावांमधून वाळूची वाहतुक केली जात आहे. सध्या वाळू घाटाचा लिलाव झालेला नसतांना देखील वाळूची वाहतुक होत आहेत. मात्र या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी महसुल विभागाचे मंडळ अधिकारी उत्तम डाखोरे यांनी तक्रारदारास ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर सदर रक्कम आज 8 जुन रोजी देण्याचे ठरले होते. मात्र, तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून याबाबत तक्रार दिली.


या तक्रारीनंतर लाचलुचपत विभागाने पडताळणी केली. दरम्यान,आज सोमवारी दुपारी कळमनुरी येथील नवीन बसस्थानका समोर लाचलुचतचे उपाधिक्षक हनुमंत गायकवाड, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, ममता अफुणे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुभाष आढाव, बुरकुले, अभिमन्यु कांदे, विजयकुमार उपरे, प्रमोद थोरात, अवी किर्तनकार, विनोद देशमुख, संतोष दुमाने, ज्ञानेश्‍वर पंचलिंगे, तानाजी मुंडे यांच्या पथकाने सापळा रचला होता. तक्रारदाराकडून मंडळ अधिकारी उत्तम डाखोरेे यांनी ३० हजार रुपयाची लाच स्विकारताच एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. एसीबीचे पोलीस उपाधीक्षक हणमंत गायकवाड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा