हिंगोलीत पुन्हा बारा कोरोना रुग्ण वाढले तर कोरोना मुळे जिल्ह्यात पहिला बळी
हिंगोलीत पुन्हा बारा कोरोना रुग्ण वाढले तर कोरोना मुळे जिल्ह्यात पहिला बळी
एका रुग्णास सुट्टी ,रुग्ण संख्या पोहचली ३९ वर
हिंगोली - मुंबई वरून परतलेल्या एका ४९ वर्षीय जवानासह इतर अकरा जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून वसमत येथील ४५ वर्षीय पुरुषाचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यात पहिला बळी गेला असून रुग्ण संख्या ३९ वर गेली आहे. तर एका रुग्णास सुट्टी दिली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुमार प्रसाद श्रीवास यांनी दिली.
दरम्यान, वसमत येथील कुरेशी मोहला या परिसरातील एका४५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याने हा परिसर कन्टेन्टमेन्ट घोषित केला होता. या रुग्णास नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. तर प्राप्त अहवालानुसार मुंबई वरून परतलेल्या एका४९ वर्षीय एसआरपीएफ जवानाला कोरोनाची बाधा झाली असल्याने त्यास कळमनुरी येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. तसेच हिंगोली तालुक्यातील खानापूर येथील एका ७० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पस्ट झाल्याने त्यास उपचारसाठी औरंगाबाद येथे भरती करण्यात आले आहे.
याशिवाय अंधारवाडी येथील
क्वारंटाइन सेंटर मधील सहा रुग्णांना कोविडची लागण झाल्याचे स्पस्ट झाले आहे. यात चार व्यक्ती पेन्शनपुरा येथील रहिवासी असून मुंबई वरून दाखल झाले आहेत. तर पाचवी व्यक्ती ही औरंगाबाद येथून भोई पुरा येथे दाखल झाली आहे. सहावा व्यक्ती हा मुंबई वरून कमलानगर येथे दाखल झाल्याने त्याच्यासहा वर्षाच्या मुलास कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.आज एक रुग्ण बरा झाल्याने त्यास सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत २२२ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी१८३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली असून आजघडीला एकूण३९ रुग्णावर उपचार सुरू आहेत. वसमत येथे सद्य स्थितीला हयातनगर येथील एकूण तीन कोरोना रुग्णावर उपचार सुरू असून प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगितले जाते.
जिल्हा सामान्य रुग्णालय येथील आयसोलेशन वॉर्डा मध्ये एकूण२३ रुग्णावर उपचार सुरु आहेत. यामध्ये चोंढी खुर्द पाच, सेनगाव तीन, रिसाला दोन, नगर परिषद चार, कालगाव सहा, सिरसम एक, ब्राह्मणवाडा एक, सुकळी एक यांचा समावेश आहे. यांना कोणतीही गंभीर लक्षणे नसल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
जिल्ह्यात आयसोलेशन वॉर्ड व कोरोना सेंटर मध्ये एकूण २६९३ रुग्णांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी २२५४ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.२२६० रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून,४१६ रुग्णावर उपचार सुरु आहेत. तर १६१ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.