दिलासादायक ; वसमत येथील एका रुग्णाची कोरोनावर मात


दिलासादायक ; वसमत येथील एका रुग्णाची कोरोनावर मात


जिल्ह्यात कोरोना बाधित२४ रुग्णावर उपचार सुरू


हिंगोली - जिल्हा समान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार घेत असलेल्या वसमत येथील सम्राट कॉलनीतील रुग्ण मंगळवारी ठणठणीत बरा झाल्याने त्यास सुट्टी देण्यात आली. आजघडीला जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटर येथे एकूण२४ रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.


दरम्यान, जिल्ह्यातील आयसोलेशन व कोरोना केअर सेंटर मध्ये एकूण२४८ रुग्ण आहेत. त्यापैकी२२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आजच्या घडीला एकूण२४ रुग्ण कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू  आहेत.वसमत केअर सेंटर येथे एकूण कोरोना संक्रमित तीन रुग्णावर उपचार सुरु आहेत यामध्ये बुधवार पेठ एक, मुरुम्बा एक, चंद्रगव्हाण एक यांचा समावेश आहे. यांना कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नसल्याचे सांगण्यात येते.


तसेच कळमनुरी येथील कोरोना केअर सेन्टर येथे एकूण दहा रुग्ण आहेत. यामध्ये काजी मोहल्ला दोन, टव्हा एक, कवडा पाच, तर गुंडलवाडी दोन यांचा समावेश आहे. तसेच कळमनुरी येथील डेडीकेटेड हेल्थ सेंटर येथे तीन रुग्ण असून यात एसआरपीएफ जवान दोन, तर एकास विशेष काळजी म्हणून औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याशिवाय लिंबाळा येथे कनेरगाव नाका एक, संतुक पिंपरी एक या दोघांचा समावेश आहे.तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील
 आयसोलेशन वॉर्डात एकूण चार रुग्णा पैकी तीन भगवती तर एक जवळा बाजार यांचा समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सद्य स्थितीला कोणतेही गंभीर लक्षणे नाहीत.तसेच सेनगाव येथे एका रुग्णावर उपचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


जिल्ह्यात आयसोलेशनवॉर्ड ,केअर सेन्टर गावपातळीवर क्वारंटाइन सेंटर अंतर्गत एकूण ४१३० रुग्णाला भरती करण्यात आले आहे. त्यापैकी ३७१३ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.३४९५ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला ६२९ रुग्णावर उपचार सुरु असून,२१४ जणांचे अहवाल अद्यापही येणे बाकी आहे. या प्रलंबित अहवालावर सर्व काही डिपेंड आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा