तेराशे रुपयांची लाच घेताना कृषी सहायक एसीबीच्या जाळ्यात
तेराशे रुपयांची लाच घेताना कृषी सहायक एसीबीच्या जाळ्यात
कृषी केंद्र सुरू करण्यासाठी मागितली होती लाच, कृषी अधीक्षक कार्यालयात रचला सापळा
हिंगोली - कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी किटनाशके,खते, बियाणी विक्री साठी परवाना देण्यासाठी तक्रार दाराकडून तेराशे रुपयांची लाच घेताना लाचखोर कृषी सहाय्यक यास सोमवारी (ता.१५) कृषी अधीक्षक कार्यालयात सापळा रचला असता लाच स्वीकारताना त्यास एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यामुळे कृषी अधीक्षक कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सेनगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक प्रदीप शिंदे यांची जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात प्रतिनियुक्तीवर गुण नियंत्रण शाखा व सांख्यिकी शाखेचा पदभार दिला होता.तक्रादाराला कृषी केंद्र सुरू करून त्यात कीटकनाशके, रासायनिक खते, बियाणे विक्री साठी परवाना तयार करून त्यावर त्यांच्या ओळखीने कृषी अधीक्षक यांची स्वाक्षरी करण्यासाठी त्याचा मोबदला म्हणून शिंदे यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती.या रकमे पैकी पूर्वी १ हजार ७०० लाच घेतली होती.उर्वरित तेराशे रुपयासाठी लाचखोर कृषी सहाय्यक प्रदीप शिंदे यांनी सारखा तगादा लावला होता. पैसे दे आणि परवाना घेऊन जा. मात्र तक्रारदार यांची उर्वरित पैसे देण्याची मानसिक इच्या नसल्याने त्याने कृषी सहायकाच्या जाचाला कंटाळून लाच लुचपत कार्यालय गाठून थेट लाच मागीतल्याची तक्रार दिली. त्यावरून लाच लुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक गायकवाड यांनी तक्रारदारच्या तक्रारीची सोमवारी( ता.१५) पडताळणी केली असता लाच मागीतल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोमवारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात त्याच्या कामकाजाच्या कक्षात दुपारी सापळा रचला असता तेराशे रुपयांच्या लाचेसह लाचखोर शिंदे यास पथकाने ताब्यात घेतले.पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक गायकवाड यांनी सांगितले. या पूर्वी तलाठी, ग्रामसेवक, अशा चौघांवर लाच घेताना कारवाई करण्यात आली होती. लॉकडावूनच्या काळात ही लाचेचे प्रकार वाढले असून ऐन कोरोना संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता लाच खोराकडून त्रास सहन करावा लागत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर ,अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक हनुमंत गायकवाड ,पोलीस निरीक्षक नितीन देशमुख,ममता अफूने यांच्या पथकाने केली. जिल्ह्यात लाचखोरी मध्ये महसूल विभाग अव्वल असून त्या खालोखाल पंचायत विभाग, पोलीस विभागाचा नंबर लागतो. हनुमंत गायकवाड यांनी पदभार घेतल्यानंतर लॉक डाऊन काळात मागील अडीच महिन्यात पाच ते सात जनावर कारवाई केली आहे. तरी देखील लाच लुचपत विभागाने आवाहन करूनही लाचेचे प्रमाण काही नियंत्रणात येत नसल्याचे दिसून येते.