हिंगोलीत पाच रुग्णाची कोरोनावर मात तर तीन नवे रुग्ण पॉझिटिव्ह
हिंगोलीत पाच रुग्णाची कोरोनावर मात तर तीन नवे रुग्ण पॉझिटिव्ह
रुग्ण संख्येच्या आलेख होतोय कमी जास्त, रुग्ण संख्या पोहचली २२ वर
हिंगोली - तालुक्यातील अंधारवाडी येथील क्वारंटाइन सेंटर येथे तीन रुग्णाला नव्याने कोरोनाची बाधा झाली असूनयातील एक रुग्ण तलाब कट्टा येथील रहिवासी आहे. तो लातूर जिल्ह्यातील निलंगा येथून गावी आला आहे.तर दुसरे दोन रुग्ण हे मुंबई वरून गावी परतले असून ते रिसाला बाजार येथील आहेत. या सर्वांचा अहवाल आज प्राप्त झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.तर एकूण पाच रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती डॉ. श्रीवास यांनी दिली.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील भरती करण्यात आलेल्या तिन्ही रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने सुट्टी देण्यात आली. हे रुग्ण भगवती येथील आहेत. तसेच वसमत येथील कोरोना सेंटर येथील मुरुम्बा येथील रुग्ण बरा झाला आहे. तर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार करीत असलेला जवान बरा झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला बुधवारी पाच कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत तर नव्याने तीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे २२ रुग्णावर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेले व वसमत येथील कोरोना सेन्टर येथे उपचारासाठी दाखल केलेले एकूण दोन रुग्ण आहेत यात बुधवार पेठ एक, चांद गव्हाण एक,यांचा समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर कळमनुरी येथील कोरोना केअर सेन्टर येथे दहा रुग्णावर उपचार सुरू असून यामध्ये काजी मोहल्ला दोन, एक टव्हा ,कवडा पाच,गुंडलवाडी दोनयांचा समावेश आहे.तसेच डेडी केटेड सेंटर येथे तीन जवानांवर उपचार सुरु आहेत.
याशिवाय शहरातील लिंबाळा येथील कोविड सेंटर येथे पाच रुग्ण असून यात कनेरगाव एक, संतुक पिंपरी एक,तालाब कट्टा एक, रिसाला दोन,यांचा समावेश आहे.तर जिल्हा सामान्य आयसोलेशन वॉर्डात जवळा बाजार येथील एका रुग्णावर उपचार सुरु असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले. जिल्ह्यात एकूण४२०८ रुग्णांना भरती करण्यात आले आहे,त्यापैकी ३७२५ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.३५२९ रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून, आजघडीला ६७७ रुग्णांना भरती करण्यात आले आहे.२७५ जणांचे अहवाल अद्यापही बाकी येणे आहे.