शाळा सुरू करण्याबाबत शाळा समितीचा अभिप्राय घ्या

शाळा सुरू करण्याबाबत शाळा समितीचा अभिप्राय घ्या


सीईओ शर्मा यांचे मुख्याध्यापकाना पत्र


हिंगोली -  कोरोनाचा प्रादर्भावाच्या प्रार्श्वभुमीवर शाळा सुरू करण्या बाबत शाळा व्यवस्‍थापन समितीचा स्‍वयंस्‍पष्ट अभिप्राय सादर करण्याच्या सुचना मुख्याध्यापकांना मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी एका पत्रकाद्वारे शुक्रवार (ता. १९) केल्या आहेत.  


शासन निर्णयानुसार (ता.15) जुन बालकांचा मोफत व सक्‍तीचा शिक्षणाचा हक्‍क अधिनियक 2009 प्रमाणे जिल्‍ह्‍यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्‍थापनाच्या शाळाच्या मुख्याध्‍यापकांनी आपल्या शाळा व्यवस्‍थापन समिती, शाळा समिती, शिक्षक पालक सभाच्या सुरक्षीत शारिरीक अंतर ठेवून किंवा व्हीसी व्हॉटअसपद्वारे आयोजीत कराव्यात. आपल्या शाळेत विलीकरण कक्ष सुरू असल्यास गावाती अन्य ठिकाणी सभेचे आयोजन करावे सदर सभेत शासनाच्या परिपत्रकाचे वाचन करावे त्‍याअनुषंगाने सभेत सर्वकष चर्चा घडवून आणावी, या सभेत परित्रत्रकाचे वाचन करावे.


यात शाळा सुरू करणे बाबतचा स्‍वयंस्‍पष्ट अभिप्राय घेण्यात यावा व त्‍या बाबतचा अहलवा आपले गटाचे गट शिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करावा सदरील अभियाप्रास अनुसरून अंतीम अहवाल जिल्‍हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करून शाळा सुरू करण्या बाबतचा अंतीम निर्णय घेणे सोयीस्‍कर होईल त्‍यामुळे विहित नमुन्याचे पालन करण्यात यावे. तसेच (ता.15) जून पासून पुढील दोन आठवड्यात शासन परिपत्रकातील परिशिष्टाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. 


यात शाळा पुर्वतयारी पंधरवाडा मध्ये शाळा व्यवस्‍थापन समितीची सभा आयोजीत करणे यात प्रत्‍येक्ष, व्हॉटअसप किंवा व्हीसी, स्‍थानिक पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधणे, पाठ्यपुस्‍तक वितरण करणे, स्‍वच्‍छता निर्जुतीकरण करण्याचे प्रयत्‍त करणे स्‍वच्‍छतागृह, पाण्याची व्यवस्‍था करणे, गटागटाने पालक सभा घेऊन जनजागृती करणे पालकांच्या मनातील भिती कमी करणे, बालरक्षक शिक्षकांनी स्‍थलांतरीत मजुरांची मुले, संभाव्य शाळाबाह्य होण्याची शक्‍यता असणारे विद्यार्थी यांच्या घरी भेटी देवून शाळेत येण्याची मानसिकता तयार करणे. 


तसेच ग्रामपंचायतच्या मदतीने टीव्ही रेडीओ, संगणक यांची व्यवस्‍था करून सोय नसलेल्या मुलांसाठी मदत करणे. 
 ग्रंथालयातील पुस्‍तकांचे अवांतर वाचन श्रमदान, कविता, लेखन तसेच गुगल क्‍लासरुम वेबिनार डिजीटल पध्दतीने शिक्षणाचे शिक्षकांचे पालकांचे सक्षीमीकरण करणे यासह दिक्षा ॲपचा प्रसार करणे आदी माहिती मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी मुख्याध्यापकांना दिलेल्या पत्रात केली आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा