जिल्हा प्रशाशन अलर्ट आहे; केवळ काळजी घ्या तुमची अन तुमच्या कुटुंबियांची - जिल्हाधिकारी जयवंशी
हिंगोली, जिल्हा प्रशाशन अलर्ट आहे; केवळ काळजी घ्या तुमची अन तुमच्या कुटुंबियांची - जिल्हाधिकारी जयवंशी
हिंगोलीकरांसी साधला फेसबुक वरून संवाद
हिंगोली- कोरोना विषाणूला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्ट असून ,केवळ तुम्ही व स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घाबरून जाऊ नका , काही शंका आल्यास आरोग्य विभागाशी तातडीने संपर्क करा आदी संदर्भात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून हिंगोलीकरांसोबत संवाद साधला.
संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार उडविला असून सर्वच राष्ट्रांना चिंतेत टाकले आहे. त्यामध्ये आपला हिंगोली जिल्हा देखील अडकलेला आहे. मात्र या संकटाला अजिबात कुणीही घाबरू नका कारण आमची प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा ही पूर्णपणे सक्षम असून आज घडीला अलर्ट देखील आहे.त्यामुळे उगाचच मनामध्ये भीती बाळगू नका सध्या जरी शिथिलता असली तरीही, प्रत्येकाने आपापली काळजी घेणे गरजेचे आहे. केवळ आपलीच नव्हे तर आपल्या घरच्यांची देखील तशाच प्रकारे काळजी घेतल्यास निश्चितच आपण या महाभयंकर म्हणून ओळख असलेल्या कोणाचा सामना करू तसेच जरादेखील कुणाला सर्दी पडसे जाणवले तर त्यांनी ताबडतोब आरोग्य विभागाशी संपर्क साधावा किंवा जे टोल फ्री क्रमांक दिले आहेत त्यावर संपर्क साधला तरीही आमची यंत्रणा तुमच्या जवळ काही वेळामध्ये पोहोचून तुम्हाला उपचार देण्यासाठी मदत करेल असे सांगितले.
एवढेच नव्हे तर आज घडीला आमच्याकडे २१० बेड हे उपलब्ध आहेत कितीही गंभीर रुग्ण आला तर आम्ही त्यावर उपचार करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. स्वतःच्या जीवाची जराही पर्वा न करता डॉक्टर, परिचारिका, पोलीस प्रशासन हे आपले कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे अजिबात घाबरू नका या कोरोणाला आपण सर्वांनी मिळून हरवायचे आहे आणि तुम्ही जर अशीच तुमची काळजी घेत राहिल्यास निश्चितच या कोरोणावर आपल्या विजय होईल आदी संदर्भात जिल्हाधिकारी यांनी हिंगोलीकरांशी संवाद साधला.
पुढे ते म्हणाले , जिल्ह्यात आतापर्यन्त एकही रुग्णाचा बळी गेला नाही. मात्र शेजारच्या जिल्ह्यात किंवा मराठवाडा व विदर्भात बहुतांश कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. परंतु हिंगोली जिल्ह्यात सुरुवाती पासून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना केल्यामुळे आजघडीला आपली परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले.