पोहण्यासाठी गेलेल्या तिन युवकाचा धरणात बुडुन मृत्यृ
पोहण्यासाठी गेलेल्या तिन युवकाचा धरणात बुडुन मृत्यृ
तालुक्यातील मोरगव्हाण येथील घटना
कळमनुरी - पोहण्यासाठी गेलेल्या पाच जणांपैकी तिघांचा कळमनुरी तालुक्यातील मोरगव्हाण जवळील ईसापुर धरणात बुडुन मृत्यु झाल्याची घटना रविवारी (ता.७) दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. या तिघांचेही मृत देह सापडले असुन मयत तरुण हे हिंगोली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवम सुधीर चौंढेकर (२१), रोहित अनिल चित्तेवार (२२), योगेश बालाजी गडप्पा (२१) अशी धरणात बुडालेल्या तरुण मुलांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवम सुधीर चौंढकर(२१) राहणार भट्ट काॅलनी हिंगोली, रोहित अनिल चित्तेवार (२२) रा. पोस्ट आफीस रोड हिंगोली, योगेश बालाजी गडप्पा (२१) रा. बियाणी नगर तसेच श्रीकांत संजीव चौंढेकर व निखील नागोराव बोलके दोघे ही राहणार हिंगोली हे पाचजण मित्र हिंगोली येथुन कळमनुरी तालुक्यातील मोरगव्हाण जवळील ईसापुर धरणात पोहण्यासाठी गेले होते. पोहल्यानंतर श्रीकांत व निखील हे दोघे जण धरणाबाहेर आले. परंतु शिवम, रोहित आणी योगेश हे पाण्या बाहेर आलेच नाहित त्यामुळे श्रीकांत व निखीलने या बाबत जवळील ग्रामस्थांना माहिती दिली. काही वेळात घटनास्थळी पोलीस अधिकारी व ईतर प्रशासकिय अधिकारी दाखल झाले. यावेळी गावातील ग्रामस्थही मदतीला धावुन आले आणी शोधकार्य सुरु झाले. गोताखोर शमशेर खाॅं पठान, तुळशिराम भिसे, कांता पाटिल व ग्रामस्थांनी तब्बल एका तासा नंतर वरील तिघांचे ही मृतदेह पाण्या बाहेर काढले. घटनास्थळी पोलीस निरक्षक रंजीत भोईटे, उप निरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, नायब तहसीलदार श्रीराम पाचपुते, मंडळ अधिकारी यु .आर. डाखोरे, तलाठी जि. एस. बेले, पोलीस कर्मचारी यु.आर .डाखोरे, पोलीस कर्मचारी शामराव गुहाडे, गणेश सुर्यवंशी, नलावर , संदिप पवार दाखल झाले.लॉकडाऊन काळात बंदी असताना संबंधित तरुणांना कोणी हटकले कसे नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावरून धरणाची सुरक्षा देखील रामभरोसे असल्याचे सिद्ध होते.