हिंगोलीत दोन लहान मुलींना कोरोनाची लागण तर दोघांना डिस्चार्ज
हिंगोलीत दोन लहान मुलींना
कोरोनाची लागण तर दोघांना डिस्चार्ज
हिंगोली - कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटर येथील दोन मुलींना
कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला असून या दोन्ही मुली काझी मोहला येथील रहिवासी आहेत.पॉझिटिव्ह महिला नांदेड येथे भरती असून तिच्या या नाती आहेत.सदर महिलेच्या संपर्कातील पंधरा जणांचे नमुने तपासणी साठी पाठविले असूनत्यापैकी दोन पॉझिटिव्ह, दोन राखीव, तर चार कॅन्सल झाले आहेत. यातील सात निगेटिव्ह अहवाल आले आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक रुग्ण ठणठणीत बरा झाल्याने त्याला सुट्टी देण्यात आली आहे. सदरील रुग्ण हा खानापूर येथील रहिवासी आहे.तसेच वसमत येथील कुरेशी मोहला येथील एक रुग्ण बरा झाला आहे. आज रोजी दोन रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. आणि नव्याने दोन लहान मुलींना कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात २४० कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी २१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजघडीला एकूण २८ रुग्णावर उपचार सुरू आहेत.
जिल्हानंतर्गत कोविडची लागण झालेल्या कोरोना केअर सेंटर येथे उपचार सुरु असलेल्या मध्ये वसमत येथे एकूण तीन रुग्ण असून यात बुधवार पेठ एक, अशोकनगर एक, मुरुम्बा एक, या तीन रुग्णाचा समावेश आहे.तसेच कळमनुरी केअर सेंटर येथे सात रुग्ण भरती असून यात काजी मोहला दोन, दाती तीन, डोंगरकडा एक, टव्हा एक,यांचा समावेश आहे.या रुग्णाची तब्येत ठीक असून उपचार सुरू आहेत. याशिवाय कलमनुरी येथील डेडीकेटेड सेंटर येथे तीन
एसआरपीएफ जवानांना भरती करण्यात आले असून , यातील एका जवानाला औरंगाबाद येथे भरती करण्यात आले आहे. तसेच लिंबाळा येथील कोअर सेंटर येथे दोघांना भरती करण्यात आले आहे यात कनेरगाव एक ,संतुक पिंपरी एक या दोघांचा समावेश आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसो लेशन वॉर्डात एकूण अकरा रुग्णावर उपचार सुरू आहेत. यामध्ये भगवती तीन, पेन्शनपुरा चार, भोईपुरा एक कमला नगर एक, सम्राटनगर एक, जवळा बाजार एक, यांचा समावेश आहे.तसेच सेनगाव येथील केअर सेंटर येथे कहाकार येथील रुग्णाचा समावेश आहे.जिल्हा सामान्य रुग्णालय येथील आयसोलेशन वॉर्ड व कोरोना सेंटर येथील क्वारंताईन अंतर्गत एकूण४०५२ रुग्णांना भरती करण्यात आले त्यापैकी ३६१७ रुग्णाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यातील३२३४ रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून, सद्य स्थितीला७५६ रुग्णावर उपचार सुरू आहेत. २४४ जणांचे अहवाल येणे बाकी आहे.