हिंगोली : ऐन कोरोना संकटात भुकंपाचा सौम्य धक्‍का ३.४ ची रिश्टरस्‍केलवर नोंद 

 


ऐन कोरोना संकटात भुकंपाचा सौम्य धक्‍का ३.४ ची रिश्टरस्‍केलवर नोंद 


भूकंपाची मालिका सुरूच  ,नागरिक भयभीत


हिंगोली  - जिल्‍ह्‍यात वसमत व कळमनुरी तालुक्‍यात मंगळवारी  सकाळी सात वाजता जमीतुन गुढ आवाज आले. हा भुकंपाचा सौम्य धक्‍का असून त्‍याची 3.4 रिश्टरस्‍केलवर नोंद झाली आहे. मागच्या दोन महिण्यापुर्वी देखील भुकंपाचा सौम्‍य धक्‍का जाणवला होता. आता एन कोरोना संकटात भूकंपाची मालिका सुरूच असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.


 वसमत व कळमनुरी तालुक्‍यातील अनेक गावात मंगळवारी सकाळी सात वाजता जमीनीतून दोन वेळेस गुढ आवाज आल्याने जमीन हादरून टिनपत्राचा खडखडाट झाल्याने घरात असलेले नागरिक रस्‍त्‍यावर आले हा भुकंचा सौम्य धक्‍का असून त्‍याची लातुर येथील भुकंपमापक यंत्रावर  3.4 रिश्टरस्‍केलवर नोंद झाल्याचे जिल्‍हा आपती व्यवस्‍थापन विभागाचे रोहित कंजे यांनी सांगितले आहे. 


दरम्‍यान, सकाळी झालेल्या भुकंपाचा सौम्य धक्‍का, वसमत तालुक्‍यातील वापटी, कुपटी, सिरळी, खांबाळा, खापरखेडा, गिरगाव आदी गावात झाला आहे. तर कळमनुरी तालुक्‍यातील पोतरा, सिंदगी, बोल्‍डा, असोला, जांब, हारवाडी, येहळेगाव गवळी, निमटोक, पेठवडगाव, सापळी, सोडेगाव, जामगव्हाण, करवाडी आदी गावात झाला आहे. या आवाजाचे मुख्य केंद्र वसमत तालुक्‍यातील पांगरा शिंदे गावात आहे. येथे अनेक वर्षापासून जमीनीतून गुढ आवाज येत आहेत. 


 वसमत, कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्‍यातील अनेक गावात हे आवाज येत आहेत. आतापर्यत ७०ते ८० वेळेस या गावात आवाज आले आहेत. पुर्वी सहा महिण्यातून एकदा आवाज येत होते .आता मात्र मागच्या काही दिवसापासून हे आठ पंधरा दिवसाला येत आहेत. मागच्या दोन महिण्यापुर्वी या गावात आलेल्या आवाजामुळे भुकंपाचा सौम्य धक्‍का बसल्याची नोंद लातुर येथील भुकंपमापक यंत्रावर झाली होती. त्‍यानंतर या गावात महसुल प्रशानाच्या अधिकाऱ्यासह पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या होत्या. 


दरम्यान, पांगरा शिंदे येथे येत असलेल्या आवाजा बाबत नांदेड येथील स्‍वारातीम विद्यापीठातील तज्ञांनी येथे भेट दिली आहे .मात्र त्‍यांनतर आवाजा बाबतचे गुढ काही सांगितले नाही .गावात आवाज आल्यावर जिल्‍हा आपती व्यवस्‍थापनाला याची माहिती गावकरी सतत देत आहेत. येथे होत असलेल्या सततच्या आवाजामुळे गावकऱ्यांतुन भिती निर्माण झाली आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा