हिंगोलीत आणखी चार रुग्णांची भर तर एक रुग्ण कोरोनामुक्त
पुणे कनेक्शन ; हिंगोलीत आणखी चार रुग्णांची भर तर एक रुग्ण कोरोनामुक्त
हिंगोली,- सेनगाव येथील कोरोना केअर सेंटर येथे क्वारंटाइन केलेल्या दोन व्यक्तींना नव्याने कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल सोमवारी रात्री दहा वाजता प्राप्त झाला आहे.ते केंद्रा बुद्रुक येथील रशिवासी असून पुण्यातून आले आहेत.ते वसमत व हिंगोली येथे परतलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून, सेनगाव तालुक्यातील काहाकर येथील एक रुग्ण बरा झाला आहे. परंतु रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाची डोखेदुखी वाढली आहे.
दरम्यान ,सेनगाव येथील कोरोना केअर सेंटर येथे काहाकर येथील रुग्ण बरा झाल्याने त्यास सुट्टी देण्यात आली आहे.जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित २७० रुग्ण झाले असून, त्यापैकी२३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजघडीला एकूण३२ रुग्णावर उपचार सुरु आहेत. तसेच वसमत येथे एका रुग्णावर उपचार सुरु आहेत.
तर कळमनुरी येथील डेडीकेटेट कोविड सेंटर येथे रुग्णावर उपचार सुरू असून यात एक एसआरपीएफ जवान, व भोसी येथील एक अशा दोन रुग्णाचा समावेश आहे. तसेच कोरोना केअर सेंटर येथे१५ रुग्णावर उपचार सुरू आहेत. यात काजी मोहल्ला सहा,कवडा सहा,गुंडलवाडी दोन ,बाभळी एक यांचा समावेश आहे.
लिंबाळा कोअर सेन्टर येथे तीन रुग्ण आहेत यात तालाब कट्टा एक, रिसाला दोन, यांचा समावेश आहे. वसमत येथे एका रुग्णावर उपचार सुरु आहेत.याशिवाय औंढा येथे दोन रुग्णावर उपचार सुरु आहेत.याशिवाय लिंबाळा येथील केअर सेन्टर येथे तीन रुग्ण असून यात तालाब कट्टा एक, रिसाला दोन, यांचा समावेश आहे. तर सेनगाव येथे पाच रुग्णावर उपचार सुरू आहेत.यामध्ये मनास पिंपरी एक,ताकतोडा एक, केंद्रा एक, लिंग पिंपरी दोन यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात एकूण क्वारंटाईन सेंटर व आयसोलेशन वॉर्ड मिळून ४५५१ रुग्णांना भरती केले आहे. त्यापैकी ४१४१ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.तर ४०२० रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला एकूण ५२५ रुग्ण भरती असून १८७ जणांचे अहवाल थ्रोट नमुने प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे.