चिंताजनक ; हिंगोलीत पुन्हा नव्याने पाच रुग्ण वाढले


चिंताजनक ; हिंगोलीत पुन्हा नव्याने पाच रुग्ण वाढले, तर तीन रुग्ण निगेटिव्ह


हिंगोली,-  सेनगाव येथील कोरोना केअर सेंटर येथे क्वारंटाइन  केलेल्या पाच व्यक्तींना नव्याने कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल रविवारी रात्री दहा वाजता प्राप्त झाला आहे.तर तीन रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास यांनी दिली. सेनगाव येथे दिल्ली, मुंबई येथून रुग्ण आले असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.



दरम्यान, सेनगाव तालुक्यातील एका२१ वर्षीय तरुणीचा कोरोनाने अकोला येथे मृत्यू झाला. सदरील युवतीला मधुमेहाचा आजार होता. आणि तिला बाहेर गावावरून येण्याचा पूर्व इतिहास नव्हता. त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या पथकाने सम्पूर्ण केंद्रा बुद्रुक गावाचे सर्वेक्षण केले असून सदर मुलीच्या संपर्कातील  ४३ व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले. या सर्वांचे थ्रोट स्वाब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगून रविवारी ४३ पैकी ४१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.तर दोघांचे अहवाल रिजेकट झाले आहेत. त्यांचा पुन्हा स्वाब घेण्यात येणार आहे.सदर युवतीने रिसोड, वाशिम, अकोला येथील खाजगी व शासकीय संस्थेमध्ये उपचार घेतले असल्याचे स्पस्ट झाले आहे.


आज प्राप्त अहवालानुसार सेनगाव क्वारंटाइन अंतर्गत पाच व्यक्तींना नव्याने कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट झाले आहे. यातील पहिला रुग्ण३०वर्ष पुरुष असून मनास गावातील रहिवासी आहे.तो दिल्ली वरून आला आहे. दुसरा रुग्ण३१ वर्ष असून ताकतोडा येथील रहिवासी असून पुणे येथून आला आहे. तिसरा रुग्ण१६ वर्षाचा असून केंद्रा बु. येथील रशिवासी असून तो मुंबईवरून आला आहे. तर चौथा रुग्ण ,आणि पाचवा हे दोन्ही लिंग पिंपरी गावातील रहिवासी असून त्या मुंबईवरून आल्या आहेत. त्यांना आल्या पासून क्वारंटाइन मध्ये भरती केले आहे.


जिल्हा आयसोलेशन वॉर्डात जवळा बाजार येथील एका रुग्ण तर कळमनुरी सेंटर मधील टव्हा येथील एक रुग्ण,व डेडी केटेट सेंटर येथील एक एसआर पीएफ जवानअसे तीन रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.तर नवीन पाचकोरोना रुग्णाची भर पडली आहे.आतापर्यन्त जिल्ह्यात कोरोना संक्रमित २६६ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी २३७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.आजघडीला एकूण २९ रुग्णावर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.कळमनुरी येथील डेडीकेटेट कोविड सेंटर येथे रुग्णावर उपचार सुरू असून यात एक एसआरपीएफ जवान, व भोसी येथील एक अशा दोन रुग्णाचा समावेश आहे. लिंबाळा कोअर सेन्टर येथे तीन रुग्ण आहेत यात तालाब कट्टा एक, रिसाला दोन, यांचा समावेश आहे. वसमत येथे एका रुग्णावर उपचार सुरु आहेत. तसेच कळमनुरी येथील कोरोना सेंटर येथे १५ रुग्णावर उपचार सुरु असून यात काजी मोहल्ला सहा, कवडा सहा, गुंडलवाडी दोन, बाभळी एक यांचा समावेश आहे. तर सेनगाव येथे एकावर उपचार सुरू आहेत.तर औंढा येथील क्वारंटाइन सेंटर येथे दोन रुग्णावर उपचार सुरु आहेत.


याशिवाय लिंबाळा येथील केअर सेन्टर येथे तीन रुग्ण असून यात तालाब कट्टा एक, रिसाला दोन, यांचा समावेश आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात जवळा बाजार येथील एका रुग्णावर उपचार सुरु आहेत.तर सेनगाव येथे एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.


जिल्ह्यात एकूण क्वारंटाईन सेंटर व आयसोलेशन वॉर्ड मिळून ४५२७ रुग्णांना भरती केले आहे. त्यापैकी ४१३२  रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.तर ३९८६  रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला एकूण ५४० रुग्ण भरती असून १९३ जणांचे अहवाल थ्रोट नमुने प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा