जिल्ह्यात २२ हजार शेतकऱ्यांना बांधावर खताचे वाटप
जिल्ह्यात २२ हजार शेतकऱ्यांना बांधावर खताचे वाटप
जिल्हाधिकारी रचेश जयवंशी यांनी जनेतेशी साधना संवाद
हिंगोली - जिल्हा कृषी प्रधान असून शेतीवर अधारीत असल्याने सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधीक आहे. २ लाख ६० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली जाणार आहे. त्यामुळे खते बियाणाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध बसून आतापर्यत २२ हजार ७७८ शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून बांधावर खताचे वाटप केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी मंगळवार (ता.१६) जनेतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना दिली.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधताना ते म्हणाले जिल्ह्यात सर्वाधीक क्षेत्र सोयाबीन पीकाचे असून २ लाख ६०हजार हेक्टरवर पेरणी केली जाणार आहे. त्याखालोखाल तूर 52 हजार हेक्टर तर कापूस 45 हजार हेक्टरवर लागवड केली जाणार असून यासाठी लागणारा खाताचा व बियाणाचा पुरवठा मुबलक प्रमाणात कृषी विभागाने शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून दिला असल्याचे श्री. जयवंशी यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यानी बाहेरील कंपनीच्या बियाणावर भर न करता स्वतःकडील बियाणाचा वापर करावा ते अधिक फायदेशीर राहणार असल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यातील खरीपाची परिस्थीती समाधान कारक असून 1 लाख 15 हजार क्विंटल बियाणे शेतकऱ्याना उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच 65 हजार मेट्रीक टन खताचा पुरवठा करण्यात आला आहे. यात युरीया. डीएपी व मिश्र खताचा समावेश आहे. हिंगोलीत डीएपी खताची मात्रा शेतकरी मोठ्या प्रमाणात वापरत असल्याने डीएपी खताचा पुरवठा कमी पडू दिला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच कोरोना बाबत ते म्हणाले कोरोना आजाराला घाबरण्याची गरज नाही, परंतू प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे काटेकोरपणे पालन केल्यास त्याचा धोका होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोना रुग्णावर उपचार व्हावेत यासाठी कोवीड रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. येथे शंभर रुग्णांवर उपचार करता येणार आहेत. येथे अद्यावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे गंभीर रुग्ण आता दुसऱ्या शहरात पाठविण्याची गरज राहणार नाही.
जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. परंतू बाजारात आल्यावर नागरीक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे स्वतःची काळजी घेणे गरजेचे असल्याने प्रशासनाने केलेल्या सुचनाचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.