धक्कादायक हिंगोलीत पुन्हा नव्याने सहा पॉझिटिव्ह


हिंगोलीत पुन्हा नव्याने सहा पॉझिटिव्ह 


रुग्ण संख्या पोहचली ३१ वर


हिंगोली -  हिंगोलीत शुक्रवारी 
 अंधारवाडी येथील क्‍वारंटाईन सेंटरमध्ये भरती असलेल्या सहा व्यक्‍तींना कोरोनाची लागण झाल्याचे 
अहवालातून स्‍पष्ट झाले असून आता कोरोना बाधीताची 
संख्या ३१ वर  गेल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. 
किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली. 


शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार क्‍वारंटाईन सेंटर 
अंधारवाडी येथील भरती असलेल्या सहा व्यक्‍तींना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्‍पष्ट झाले आहे. या रुग्णात २८  वर्षीय महिला व ११ वर्षीय मुलगा हे रिसाला बाजार येथील कोरोना रुग्णाच्या कुटूंबातील व्यक्‍ती आहेत. व सर्वजण मुंबई मधुन हिंगोलीत आलेले आहेत. ते आल्यापासून अंधारवाडी येथील क्‍वारंटाईन सेंट येथे भरती आहेत. 


 तसेच यात एक ३३  वर्षीय पुरुष नगरपरिषद कॉलनी हिंगोली येथील रहिवासी आहे. तो व त्‍याचे कुटूंब पुणे येथून हिंगोली येथे आलेले आहेत. यासह ३० वर्षीय पुरुष २७
वर्षीय महिला व ९ वर्षाची मुलगी हे सर्व एका कुटूंबातील 
सदस्य असून ते मुंबई मधून हिंगोली येथे आले आहेत. सध्या हिंगोली जिल्‍ह्‍यात कोरोनाचे एकूण १९५ रुग्ण झाले असून त्‍यापैकी १६१ रुग्ण बरे झाल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज 
देण्यात आला आहे.  


सद्यस्‍थितीत एकूण ३१  रुग्णावर 
उपचार सुरू असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले. या सर्व रुग्णांवर तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात 
येत आहेत. दरम्‍यान, हिंगोली जिल्‍ह्यात मुंबई येथून येणारे व्यक्‍ती 
आतापर्यत पॉझीटीव्ह निघत असल्याचे दररोज येणाऱ्या 
अहवालातून स्‍पष्ट होत आहे. एक व्यक्‍ती पॉझीटीव्ह निघाल्यावर त्‍यांच्या संपर्कात आलेले व्यक्‍ती देखील 
पॉझीटीव्ह येण्याचे प्रमाण वाढत आहे. विविध कोरोना सेंटर व आयसोलशेन वार्डात दाखल असलेल्यांची तज्ञ 
टिमतर्फे योग्य तपासणी होत असल्याने हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील कमी होत आहे. मात्र मुंबईचे आलेले 
व्यक्‍ती कोरोना बाधीत होत असल्याचे स्‍पष्ट होत आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा