हिंगोलीत सिडीपीओची चार पदे अद्यापही रिक्तच.!

हिंगोलीत सिडीपीओची चार पदे अद्यापही रिक्तच.!


प्रभारीवरच चालतो अंगणवाड्याचा कारभार


हिंगोली - जिल्ह्यात बालविकास अधिकाऱ्यांची चार पदे मागील वर्षांपासून अद्यापही रिक्तच असल्याने अंगणवाड्यांचे कामकाज प्रभारी अधिकाऱ्यावरच  चालत असल्याने अंगणवाडीतील कामे वेळेत पूर्ण होत नाही.त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेहमी ओरड असते .त्यामुळे बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या कायमस्वरूपी जागा भराव्यात अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.


येथील जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यात एक हजार ८९ अंगणवाड्या चालविल्या जातात. यामधून एक हजार पेक्षा अधिक सेविका, मदतनीस यांच्याकडून झिरो ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहार, दंड घेर, वजन, लसीकरण,  तसेच रेकॉर्ड आदींची माहिती अपडेट करणे आदी कामे केली जातात. सेविका व मदतनीस यांच्यावर लक्ष ठेवून कामे वेळेत पूर्ण करून घेणे याची जबाबदारी मुख्यसेविका यांच्यावर असते. तसेच स्तनदा माता, किशोर वयीन मुली, गरोदर माता, यांच्या आहाराची काळजी घेतली की नाही, पोषण आहार, तपासणी आदी कामाचा आढावा बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडून बैठकातून घेतला जातो.


जिल्ह्यात सिडीपोओ ची सहा पदे मंजूर असताना केवळ दोन पदे भरली आहेत यामध्ये हिंगोली, औंढा तर चार पदे अद्यापही अनेक वर्षांपासून भरलेली नाहीत.त्यामुळे 
अंगणवाडीतील कामे पाहण्यासाठी अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.जिल्ह्यात सहा बालविकास प्रकल्प असून यात हिंगोली, बाळापूर, कळमनुरी, औंढा, वसमत व सेनगाव यांचा समावेश आहे.


हिंगोली ग्रामीण प्रकल्प अधिकारी पदाचा पदभार गणेश वाघ यांच्याकडे आहे. मात्र मागील तीन ते चार वर्षांपासून महिला बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती ढेरे यांची बदली औरंगाबाद येथे झाल्याने त्यांची जागा रिक्त असून अद्यापही शासनाने कायमस्वरूपी अधिकारी दिला नाही. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून गणेश वाघ यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिला आहे त्यामुळे गणेश वाघ यांना दुहेरी भूमिका बजावत तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर कळमनुरी, बाळापूर येथील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदल्या झाल्याने त्यांचा पदभार राजकुमार धापसे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. धापसे यांना ही कळमनुरी, बाळापूर प्रकल्पाचा गाडा चालवावा लागत आहे. याशिवाय वसमत येथे सिडीपीओ ची जागा अनेक वर्षांपासून रिक्त असताना चक्क मुख्यसेविका असलेल्या सारेकर यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. तसेच सेनगाव येथे ही कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने सध्यातरी गणेश वाघ हेच गाडा चालवितात. औंढा प्रकल्पाला मात्र नैना पाटील हया कायमस्वरूपी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.


कळमनुरी, आखाडा बाळापूर,सेनगाव ,वसमत या चार ठिकाणी बालविकास प्रकल्प अधिकारी यांची पदे रिक्त असल्याने अंगणवाड्यांची बांधकामे, जागेसाठी पाठपुरावा या बाबी रखडलेल्या अवस्थेत आहेत. बहुतांश अंगण वाड्यांची अवस्था ही जिल्हा परिषदेच्या शाळेप्रमाणे झाली आहे. त्यामुळे बालविकास अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी पालकातून मागणी केली जात आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा