घोषणाबाजी करीत खुर्च्यांची केली  तोडफोड   जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील प्रकार


घोषणाबाजी करीत खुर्च्यांची केली  तोडफोड  


जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील प्रकार ,स्वाभिमानी शेतकरी संघटना


हिंगोली - शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे ,कृषी विभागाचे करायचे काय खाली मुंडके वर पाय अशा घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयात येऊन मंगळवारी खुरच्याची तोडफोड करून चालू असलेली सभा उधळून लावली असल्याचा प्रकार घडला.


येथील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात मंगळवारी( ता.२३) तीनच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकीने यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कार्यालयावर पाच ते सहा कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील सेनगाव, हिंगोली, वसमत, कळमनुरी तालुक्यात महाबीज मंडळाचे, अंकुर कंपनी आदींच्या निकृष्ट  बियाणांची पेरणी केली असता मात्र हे बियाणे उगवले नसल्याची विचारणा कृषी अधिकारी विजय लोखंडे यांच्याशी केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे  दिल्याने कृषी विभागात सुरु असलेल्या सभेत शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी घुसून घोषणाबाजी करीत खुर्च्यांची तोडफोड करीत सभा उधळून लावल्याने हा गोंधळ तासभर सुरु होता.


जिल्ह्यात काही ठिकाणी महाबीज व इतर बियाणांची पेरणी केली असता काही ठिकाणी अत्यल्प प्रमाणात उगवले, तर काही ठिकाणी उगवले नसल्याचे सांगून आधीच गेली तीन महिन्यापासून शेतकरी कोरोना
 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आल्याने शेतकरी हैराण झाला आहे. त्यातच पुन्हा मागील वर्षी उत्पादन घेतलेल्या सोयाबीन, कापूस, हळद पिकांना पुरेश्या प्रमाणात भाव मिळत नाहीत त्यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत सापडला असताना आता यंदा खरीप हंगामात एन पेरणीच्या काळात बियाणे कंपनी कडून बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे .याबाबत संघटनेने कंपन्यांवर काय कारवाई  करता असा जाब विचारला असता अधिकारी निरुत्तर झाले.यावेळी महाबीज, अंकुर निकृष्ट बियाणे कंपनीचा निषेध व्यक्त केला आहे.यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक उधळून लावत घोषणाबाजी सुरु केली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, शेतकरी संघटनेचा विजय असो असे म्हणत सुरु असलेल्या बिठकीत गोंधळ घातला.यावेळी नामदेव पतंगे,सुभाषराव गाडगे, बापूराव गरड, पराग अडकीने, नारायण कदम ,गोपीनाथ बहादूरे ,ऋषिकेश बर्वे आदींनी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात गोंधळ घालत खुर्च्यांची तोडफोड केली.


यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांनी शांत राहण्याच्या सूचना दिल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संबंधित निकृष्ट बियाणे कंपनीवर पंचनामे करून कारवाई केली जाणार असल्याचे अश्वासन दिल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यलायातून काढता पाय घेतला त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यापूर्वी देखील एनटीसी येथील पीक विमा कार्यालयात घुसून तोडफोड केली होती आता ही दुसरी घटना आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा