राष्ट्रीय महामार्गाची कामे दर्जेदार करा - निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी
राष्ट्रीय महामार्गाची कामे दर्जेदार करा
निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांचे कंपनीच्या मॅनेजरला तंबी
हिंगोली - जिल्ह्यात१६१ व अन्य राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू असून ती दर्जेदार व लवकरात पूर्ण करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी संबंधित महामार्गाच्या व्यवस्थापकाला दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी (ता.२२) महामार्गाच्या व्यवस्थापकाची बैठक घेण्यात आली यावेळी सूर्यवंशी यांनी चालू असलेल्या कामांचा आढावा घेऊन व्यवस्थापकांना वेळेत दर्जेदार कामे पूर्ण करण्याचे आदेश ठोठावले आहेत. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बर्गे,खनिकर्म अधिकारी कळसकरआदींची उपस्थिती होती.
सूर्यवंशी पुढे म्हणाले ,जिल्ह्यात विविध कंपनी कडून राष्ट्रीय महामार्गाची कामे हाती घेण्यात आले असून ही कामे चांगले व दर्जेदार करावी तसेच गौण खनिजांची रॉयल्टी तातडीने भरणा करावी. रॉयल्टी भरणा न केल्यास आपल्यावर कारवाई करण्याचा इशारा सूर्यवंशी यांनी दिला आहे.
जिल्ह्यात सेनगाव-रिसोड मार्गावर केलेल्या कामावर तडे पडल्याच्या तक्रारी आल्या आहेत. बोगस कामे करू नका, असा इशारा व्यवस्थापकांना सूर्यवंशी यांनी दिला आहे. तसेच वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.