खड्यात बेशरमचे झाड लावून बळसोंड ग्रामपंचायतचा निषेध
खड्यात बेशरमचे झाड लावून
बळसोंड ग्रामपंचायतचा निषेध
तर रस्त्याची डागडुजी न केल्यास बळसोंड ग्रामपंचयतला कुलूप ठोकण्याचा इशारा
हिंगोली - बळसोंड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वसाहतीत खड्डे पडल्याने पावसाळ्यात चालणे देखील मुश्किल झाले आहे. अनेक वेळा सांगून देखील ग्रामपंचायत लक्ष देत नाही. त्यामुळे रविवारी बायपास परिसरातील पडलेल्या खड्यात
बेशरमीचे झाड लावून पपू चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने निषेध नोंदवीन्यात आला. तर आठ दिवसात खड्याची डागडुजी न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा पपू चव्हाण यांनी दिला आहे.
बळसोंड ग्रामपंचायत अंतर्गत सुमारे दहा ते पंधरा वसाहती येतात यामध्ये अंतुलेनगर,नामदेवनगर ,आनंदनगर, पंढरपूरनगर ,शिक्षक कॉलनी, माउली नगर, रामकृष्ण नगर, आदी नगरांचा समावेश आहे.बहुतांश भागात रस्ते, विद्युत पुरवठा ,नाल्या नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. तसेच अकोला बायपास सह अनेक नगरात रस्ते नसल्याने पडलेल्या खड्यात पावसाचे पाणी साचून डबके तयार झाल्याने अपघात होत आहेत.अकोला बायपास बाजारपेठ ,तसेच आदर्श कॉलेज कडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्ड्यात पावसाचे पाणी साचत आहे. याशिवाय आनंदनगर, रामकृष्ण नगर, आदी भागात ही गेली पाच वर्षात कुठलेच म्हणावी तशी विकासकामे झाली नसल्याने ग्रामपंचायतचा निधी कुठे जात आहे. याची चौकशी करण्याची मागणी करून रविवारी बायपास परिसरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात
बेशरमची झाडे लावून बळसोंड ग्रामपंचयातचा निषेध करीत पपू चव्हाण मित्र मंडळाने येत्या आठ दिवसात बळसोंड परिसरातील रस्त्यावरील खड्याची डागडुजी न केल्यास बळसोंड ग्रापला टाळे ठोकण्याचा इशारा चव्हाण यांनी दिला आहे. या वेळी पप्पू चव्हाण, दिलीप माने, सुमित घिके, कावरखे , गणेश बोरकर,माधव भवर, व्यापारी मंडळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.