हिंगोलीत अकरा योध्याचा कोणावर विजय
हिंगोलीत अकरा योध्याचा कोणावर विजय
आता बाधीत रुग्णांची संख्या १७ वर ,जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल
हिंगोली - येथील जिल्हा सामान्य रुग्णांलयात सहा, वसमत येथील एक व कळमनुरी येथील चार असे एकूण अकरा कोरोना रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता जिल्ह्यात 17 रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी सोमवार (ता.22) दिली.
हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णांलयातील आयसोलेशन वार्डातील सहा कोरोना रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात चार पेन्शनपुरा येथील एक भोईपुरा तर एक कमलानगर येथील रहिवासी आहे. वसमत येथील अशोक नगर येथील एक, कळमनुरी केअर सेंटर येथील चार रुग्णात तीन दाती तर एक रुग्ण डोंगरकडा येथील आहे. ते बरे झाल्याने एकूण अकरा रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आजपर्यत जिल्ह्यात एकूण 240 रुग्ण झाले आहेत त्यापैकी 223 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या 17 रुग्णावर उपचार सुरू आहेत. हिंगोली जिल्ह्यात लागण झालेले व उपचारसाठी कोरोना केअर सेंटर वसमत येथे दोन रुग्ण आहेत यात एक बुधवारपेठ तर दुसरा मुरुंबा येथील आहे. त्यांची प्रकृती स्थीतर असून त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत.
कळमनुरी येथील केअर सेटर येथे तीन रुग्ण आहेत यात दोन काजी मोहल्ला तर एक टव्हा येथील आले त्यांची प्रकृती स्थीर असून त्यांनाही कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत तसेच डेडीकेट हेल्थ सेंटर कळमनुरी येथे तीन रुग्ण आहेत यात एसआरपीएफ जवान उपचारासाठी भरती आहेत. एक जवान विशेष काळजी म्हणून औरंगाबाद येथील धूत हॉस्पीटल येथे संदर्भीत करण्यात आले आहे.
लिंबाळा येथील केअर सेंटरतंर्गत दोन रुग्ण आहेत यात एक कनेरगाव नाका, एक संतुकपिंप्री येथील असून ते उपचारासाठी भरती आहेत. त्यांची प्रकृती स्थीतर असून त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात पाच कोरोना रुग्ण आहेत यात तीन भगवती, एक वसमत येथील, एक जवळा बाजार येथील आले. त्यांची प्रकृती स्थीतर असून त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. त्यांच्यावर तज्ञ वैद्यकिय टिम मार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत.
सेनगाव येथे एक कहाकर बुद्रुक येथील एक रुग्ण भरती आहे. जिल्ह्यातंर्गत आयसोलेशन वार्ड सर्व कोरोना सेंटर आणी गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरतंर्गत 4075 व्यक्तीना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी 3670 व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 3382 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला ओ. सद्यस्थीतीत 686 व्यक्ती भरती आहेत आणि आज रोजी 213 अहवाल प्रलंबीत असल्याची माहिती डॉ. श्रीवास यांनी दिली.