नव्याने परतलेल्या दोघांना कोरोनाची लागण तर पाच रुग्णांना सुट्टी


पुन्हा मुंबई कनेक्शन; औंढ्यात नव्याने परतलेल्या दोघांना कोरोनाची लागण तर पाच रुग्णांना सुट्टी


हिंगोली,-  शनिवारी रात्री प्राप्त अहवालानुसार औंढ्यात परतलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाली असून ते दोघेही मुंबई येथील रहिवासी आहेत. त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांच्याबरोबर इतर अकरा व्यक्ती दाखल झाले आहेत.तर पाच रुग्णांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुमार प्रसाद श्रीवास यांनी दिली आहे.



शनिवारी मुंबई वरून परतलेल्या कोरोना लागण झालेल्या दोघांना औंढा येथील कोरोना केअर सेंटर मध्ये भरती केले आहे. सदरील दोन्ही रुग्ण हे
चिंचवाडा वसई मुंबई येथील आहेत. सर्वव्हेक्षण करतेवेळी या दोघांना ताप आल्याने त्यांना आशा वर्कर यांनी थ्रोट स्वाब तपासणी करण्याचा सल्ला दिला होता.आणि होम क्वारंटाइन राहण्यास सांगितले होते.त्यानुसार या दोघांनी मुंबई येथे( ता.२५) थ्रोट नमुने तपासणी साठी दिले होते.होम 
क्वारंटाईन न राहता स्वतःच्या वाहनाने इतर अकरा व्यक्ती सोबत शनिवारी औंढा येथे दाखल झाले. दरम्यान, मुंबई येथील आशा वर्कर यांनी पिंपळदरी येथील सामाजिक कार्यकर्ता यांना दूरध्वनी करून या दोन्ही व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. त्यामुळे या दोघांनाही औंढा येथे दाखल होताच त्यांना कोरोना केअर सेंटर येथे भरती करण्यात आले. असून सोबत आलेल्या अकरा व्यक्तींना देखील क्वारंटाइन केले आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.


कळमनुरी येथील डेडीकेटेट कोविड सेंटर येथील दोन रुग्ण बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. यात दोन
एसआरपीएफ जवान,वसमत येथील बुधवार पेठेतील एक, लिंबाळा येथील दोन, कनेरगाव एक, संतुक पिंपरी एक हे रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याने रुग्णालय प्रशासनाची चिंता मिटली आहे. आजघडीला पाच रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली तर नव्याने पुन्हा दोन रुग्णांची भर पडली आहे.


जिल्ह्यात कोरोनाचे एकूण २६१ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी २३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजघडीला एकूण २७  रुग्णावर उपचार सुरू आहेत.तसेच कळमनुरी येथे १७ रुग्णावर उपचार सुरू आहेत यात काजी मोहला सहा, टव्हा एक, कवडा सहा , गुंडलवाडी दोन, बाबळी एक,एसआरपीएफ जवान एक यांचा समावेश आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून कोणतेही गंभीर लक्षणे नाहीत.


कतर कोविड सेंटर कळमनुरी येथे दोन रुग्णावर उपचार सुरू आहेत यामध्ये एसआर पीएफचे एक जवान ,भोसी येथील एकावर उपचार सुरु आहेत. तर वसमत येथे एका रुग्णावर उपचार सुरु आहेत यात चांद गव्हाण एक यांचा समावेश आहे.


याशिवाय लिंबाळा येथील केअर सेन्टर येथे तीन रुग्ण असून यात तालाब कट्टा एक, रिसाला दोन, यांचा समावेश आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात जवळा बाजार येथील एका रुग्णावर उपचार सुरु आहेत.तर सेनगाव येथे एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.


जिल्ह्यात एकूण क्वारंटाईन सेंटर व आयसोलेशन वॉर्ड मिळून ४४९३ रुग्णांना भरती केले आहे. त्यापैकी ३६९३ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.तर ३९०७ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला एकूण ५८४ रुग्ण भरती असून ३४५ जणांचे अहवाल थ्रोट नमुने प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा