चिंताजनक ; हिंगोलीत पुन्हा दोघांना कोरोनाची लागण ,२५वर्षीय महिलेचा समावेश
चिंताजनक ; हिंगोलीत पुन्हा दोघांना कोरोनाची लागण ,२५वर्षीय महिलेचा समावेश
ग्राफ मात्र वाढतोय, रुग्ण संख्या गेली ४१ वर
हिंगोली - मुंबई वरून वसमत मध्ये परतलेल्या एका २५ वर्षीय माहिलेसह , गुरुवारी कोरोना मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील एका २० वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल शुक्रवारी (ता.१२)प्राप्त झाला असून कोरोना बाधित महिला सम्राट कॉलनी येथील रहिवासी आहे. त्यामुळे कोरोनाचा ग्राफ वाढतच चालला असल्याने आता रुग्ण संख्या ४१ वर गेली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.
दरम्यान, जिल्ह्यात कोरोना लागण झालेले आतापर्यन्त एकूण २२४ रुग्ण संख्या आहे. त्यापैकी १८३ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला एकूण ४१ पॉझिटिव्ह रुग्णावर कोविड सेंटर येथे उपचार सुरु असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले.
जिल्हानंतर्गत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना उपचारासाठी
वसमत येथील कोरोना केअर सेंटर
येथे पाच रुग्ण आहेत. यामध्ये हयातनगर येथील एकूण तीन,कुरेशी मोहल्ला एक, सम्राट कॉलनी एक अशा पाच रुग्णांचा समावेश आहे.
तसेच कळमनुरी येथील कोविड केअर सेंटर येथे पाच रुग्ण असून यात जाम एक, दाती तीन, डोंगरकडा एक, येथील रहिवाश्यांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे दिसून येत नाहीत. याशिवाय कळमनुरी येथे एका एसआरपीएफ कोरोना रुग्णाला उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय येथील आयसोलेशन वॉर्डा मध्ये एकूण ३० रुग्णावर उपचार सुरु आहेत. यामध्ये चोंढी खुर्द पाच, सेनगाव तीन, रिसाला दोन, नगर परिषद चार, कालगाव सहा, सिरसम एक, ब्राह्मणवाडा एक, सुकळी एक ,खानापूर एक,
पेन्शनपुरा चार ,भोईपुरा एक, कमला नगर एक,अश्या एकूण१९ रुग्णावर उपचार सुरु आहेत. यांना कोणतीही गंभीर लक्षणे नसल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
जिल्ह्यात आयसोलेशन वॉर्ड व कोरोना सेंटर मध्ये एकूण २७४६ रुग्णांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी २२७० रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.२२६९ रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून,४५३ रुग्णावर उपचार सुरु आहेत. तर आजघडीला १९१ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.