शेतीच्या वादातून मारहाण परस्परविरूध्द गुन्हे दाखल घोटा येथील घटना
शेतीच्या वादातून मारहाण परस्परविरूध्द गुन्हे दाखल घोटा येथील घटना
नर्सी नामदेव - हिंगोली तालुक्यातील घोटा देवी येथे शेतीच्या जुन्या वादातून मारहाण केल्याची घटना (ता.३) घडली असून याविरुद्ध परस्परविरूध्द नर्सी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घोटा देवी येथील अंबादास बळीराम गिरी, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी कैलास उद्धवराव उगारे याने जुन्या शेतीच्या वाद्याचे कारणावरून व शेतात टीन शेड का उभारतो या कारणावरून फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मुक्का मार दिला व जीवे मारण्याची धमकी दिली तर कैलास उद्धवराव उगारे, याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बळीराम निवृत्ती गिरी, बबन बळीराम गिरी, विमल बळीराम गिरी, यांनी संगणमत करून फिर्यादीस शेतीच्या जुन्या वाद्याचे कारणावरून शिवीगाळ करून डोक्यात पाठीत,पायावर, हातावर, काठीने मारून जखमी केले व शेतात आलास तर जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून नर्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास जाधव हे करीत आहेत.