वाशिमच्या कर्ज बाजारी व्यापाऱ्याची इसापुर धरणात आत्महत्या
वाशिमच्या कर्ज बाजारी व्यापाऱ्याची इसापुर धरणात आत्महत्या
कळमनुरी - तालुक्यातील जटाळवाडी शिवारात मालेगाव जि. वाशीम येथील 40 वर्षीय व्यापाऱ्याने ता. बुधवारी 10 च्या रात्री आत्माहत्या केल्याची घटना घडली.
या बाबत सविस्तर माहिती अशी की कळमनुरी तालुक्यातील मौजे जटाळवाडी शिवारात बुधवारी (ता. 10) जुन च्या रात्री मालेगांव येथील आडत व्यापारी योगेश गंगासा गोरे (४०) यांनी आपल्या व्यवसाया मध्ये वेळोवेळी आलेल्या नुकसान व व्यवसायीक नुकसान झाल्याने बाजारातुन कर्ज घेतला होता. परंतु कर्जाची परतफेड होत नसल्याने या मानसीक दबावात येऊन आत्महत्या केल्याची माहिती जवळच्या नाते वाईकांनी दिली .
दरम्यान,घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरक्षक रंजीत भोईटे, सहाय्यक पोलीस उपनिरक्षक अहेमद खां पठान, पोका शिवाजी पवार, संदिप पवार एस. टि .गायकवाड यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर व्यक्तीचे प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुगणाल्य येथे पाठविण्यात आले. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात उशीरा पर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.