चिंताजनक ; हिंगोलीत पुन्हा दोघांना कोरोनाची लागण
चिंताजनक ; हिंगोलीत पुन्हा दोघांना कोरोनाची लागण ,कही खुशी कही गम
आता रुग्ण संख्या पोहचली ३७ वर
हिंगोली - मुंबई येथून सेनगाव तालुक्यात परतलेल्या एका१८वर्षीय तरुणाला क्वारंटाइन केल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट झाले आहे.सदरील युवक हा काहाकर बुद्रुक येथील रहिवासी आहे. तर दुसरी कळमनुरी येथील५५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पस्ट दिसून येत आहे.
आजपर्यंत जिल्ह्यात कोरोना झालेले २३८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २०१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला एकूण २७ रुग्णावर उपचार सुरू आहेत.हिंगोली जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेले व उपचारासाठी कोरोना केअर सेंटर वसमत येथे एकूण चार रुग्ण आहेत त्यात एक कुरेशी मोहल्ला, एक बुधवारपेठ, एक अशोकनगर, एक मुरुंबा येथील रहिवासी आहेत ते उपचारासाठी भरती आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थीर असून कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथे एकूण पाच कोरोना रुग्ण आहेत यात तीन दाती येथील, एक डोंगरकडा, एक टव्हा येथील रहिवासी आहेत. ते उपचारासाठी भरती झाले आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थीर असून कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर कळमनुरी येथे 3 कोरोना रुग्ण असून ते एसआरपीएफ जवान भरती आहेत. व एका जवानांला विशेष काळजी म्हणून औरंगाबाद येथील धुत हॉस्पीटल येथे संदर्भीत करण्यात आले आहे.
हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णांलयातील आयसोलेशन वार्डात एकूण २१ रुग्ण आहेत यात तीन भगवती, सहा कलगाव, एक सिरसम बुद्रुक, एक ब्राम्हणवाडा. एक सुकळी वळण, एक खानापूर, चार पेन्शनपुरा, एक भोईपुरा, एक कमलानगर, एक सम्राटनगर वसमत, एक जवळा बाजार यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते उपचारासाठी भरती आहेत. त्यांची प्रकृती स्थीर असून सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. त्यांच्यावर तज्ञ वैद्यकिय टिम मार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत.
हिंगोली जिल्ह्यातंगृत प्रत्येक तालुक्यात विविध गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वॉरंटाईन सेंटर अंतर्गत आज पर्यत ९८० व्यक्तींना भरती करण्यात आले आहे. 808 व्यक्तीचा स्वॅब अहवाल निगेटीव्ह आला आहे. ७२५व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्या २५४ व्यक्ती भरती आहेत. तर ९९ अहवाल प्रलंबीत आहेत. आतापर्यत आयसोलेशन वार्ड व जिल्ह्यात सर्व कोरोना सेंटरमध्ये ३९४४ व्यक्तींना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ३५४८ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ३२१२ व्यक्तींना डिस्चार्ज दिला असून सद्यस्थितीत ७१० व्यक्ती भरती आहेत. तर २२४ अहवाल प्रलंबीत आहेत.
हिंगोली जिल्ह्यातंर्गत आयसोलेशन वार्ड व जिल्ह्यात सर्व कोरोना सेंटर व गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वॉरंटाईन सेंटर अंतर्गत एकूण ३९४४ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी ३५४८ व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ३२१२ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ७१० व्यक्ती भरती आहेत तर २२४ अहवाल प्रलंबीत असल्याची माहिती डॉ. श्रीवास यांनी दिली.