बाळापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे जोडेमारो आंदोलन
बाळापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे
जोडेमारो आंदोलन
पडवळकर यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत प्रतिकात्मक पुतळ्याला मारले जोडे
आ.बाळापुर - भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर याच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करीत राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने शनिवारी जोडेमारो आंदोलन करून पडवळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबदल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, आमदार राजू नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यां तर्फे गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला नवीन बसस्थानका समोर जोडे मारून आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार राजु नवघरे, जिल्हाध्यक्ष तथा पालिकेचे उपनगराध्यक्ष हिंगोली दिलीप चव्हाण, ठाकुरसिंग बावरी,श्रिंकात वाघमारे, बाबुराव वानखेडे, विलास सावंत, अभिजित देशमुख, शिवाजी शिंदे, उमेश गोरे, विजय गावंडे, योगेश पाटील, नदिम पठाण , रमेश आडकीणे, बाबा नगरसेवक अभिजित देशमुख , श्रीकांत वाघमारे, विलास बेंद्रे,हुमायून नाईक, डॉ. प्रदीप नरवाडे, राहुल कदम, योगेश पाटील, तात्याराव मगर,आदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी शरदचंद्र पवार यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडवळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.त्यानंतर बाळापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांना निवेदन देण्यात आले.