तीन रुग्णाची कोरोनावर मात तर एकाला कोरोनाची लागण रुग्ण संख्या गेली ३९ वर
तीन रुग्णाची कोरोनावर मात तर एकाला कोरोनाची लागण रुग्ण संख्या गेली ३९ वर
हिंगोली - वसमत येथील कोविड केअर सेंटर येथे क्वारंटाईन केलेले तीन रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.तर वसमत येथील एकाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल शनिवारी उशिराने प्राप्त झाला आहे.
वसमत येथील एका २७ वर्षीय नव्याने पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे.तो अशोक नगर येथील आहे.तसेच हयात नगर येथील तीन रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यन्त जिल्ह्यात कोरोनाचे २२५ रुग्ण झाले असून त्यापैकी १८६ रुग्ण बरे झाले आहेत. आजघडीला ३९ रुग्णावर उपचार सुरू आहेत.
तसेच कळमनुरी येथील कोविड केअर सेंटर येथे पाच रुग्ण असून यात जाम एक, दाती तीन, डोंगरकडा एक, येथील रहिवाश्यांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे दिसून येत नाहीत. याशिवाय कळमनुरी येथे एका एसआरपीएफ कोरोना रुग्णाला उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय येथील आयसोलेशन वॉर्डा मध्ये एकूण ३० रुग्णावर उपचार सुरु आहेत. यामध्ये चोंढी खुर्द पाच, सेनगाव तीन, रिसाला दोन, नगर परिषद चार, कालगाव सहा, सिरसम एक, ब्राह्मणवाडा एक, सुकळी एक ,खानापूर एक,
पेन्शनपुरा चार ,भोईपुरा एक, कमला नगर एक,अश्या एकूण१९ रुग्णावर उपचार सुरु आहेत. यांना कोणतीही गंभीर लक्षणे नसल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
जिल्ह्यात आयसोलेशन वॉर्ड व कोरोना सेंटर मध्ये एकूण २२८३५ रुग्णांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी २३२८ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.२२८० रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून, ५३० रुग्णावर उपचार सुरु आहेत. तर आजघडीला १३५ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.