दादर नगर हवेली येथून दहा मजुर गावी परतले खासदार  राजीव सातव यांचा पुढाकार


दादर नगर हवेली येथून दहा मजुर गावी परतले


खासदार  राजीव सातव यांचा पुढाकार


जिल्‍ह्‍यातील  केंद्रशासित प्रदेशात कामानिमित स्‍थलांतरीत झालेले आदीवासी बांधव बुधवारी  जिल्‍ह्‍यात परत आले असून त्‍यांना गावापर्यत पोहचविण्यासाठी खासदार  राजीव सातव यांनी मदत केली आहे. तर यासाठी जिल्‍हा परिषद सदस्य डॉ. सतिश पाचपुते यांनी पाठपुरावा केला आहे. 


जिल्‍ह्‍यातील वसमत व कळमनुरी तालुक्‍यातील आदीवासी समाज बांधव कामासाठी दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात स्‍थलांतरीत झाले होते. सध्या येथे चक्रिवादळाचा तडाखा बसत असल्याने अनेकांना सोयीची ठिकाणी ठेवण्यात आले आहे. त्‍यात हिंगोली जिल्‍ह्‍यातील दहा आदीवासी समाज बांधवाचा यात समावेश आहे. मागच्या काही दिवसापासून चक्रीवादळ येथे येणार असल्याची माहिती दिल्यानंतर हे मजुर गावी जाण्यासाठी प्रयत्‍न करीत होती. मात्र त्‍यांना अडचणी येत होत्या त्‍यांनी ही बाब जिल्‍हा परिषद सदस्य तथा आदिवासी युवक कल्याण संघाचे जिल्‍हाध्यक्ष डॉ. सतिश पाचपुते यांना सांगितले. ही माहिती खासदार  राजीव सातव यांना सांगितली.


त्‍यानंतर खासदार सातव यांनी यासाठी पुढाकार घेत त्‍यांच्या येण्याची व्यवस्‍था केली यासाठी शासकिय पातळीवर मदत करण्यासाठी आदिवासी विभागाचे प्रकल्‍प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी विविध कार्यालयाची मान्यता घेवून सहकार्य केले. यामुळे वसमत तालुक्‍यातील पांगरा शिंदे, कोठारवाडी तर कळमनुरी तालुक्‍यातील सिंदगी या गावातील मजुराचा यात समावेश आहे. हे मजुर बुधवारी त्‍यांच्या गावी परतले असल्याचे डॉ. सतिश पाचपुते यांनी सांगितले.  दरम्‍यान गावी परत आलेल्या या मजुरांनी त्‍यांच्या कुटूंबीयांनी सर्वाचे आभार मानले आहेत.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा