पुन्हा मुंबई कनेक्शन ; हिंगोलीत आणखी एका ४० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण तर एक कोरोनामुक्त
पुन्हा मुंबई कनेक्शन ; हिंगोलीत आणखी एका ४० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण तर एक कोरोनामुक्त
कही खुशी कही गम ,रुग्ण संख्या पोहचली ७७ वर
हिंगोली - मुंबई हुन हिंगोली शहरातील रिसाला बाजार भागात परतलेल्या एका ४० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल मंगळवारी रात्री आठच्या सुमारास प्राप्त झाला. असून तर औंढा तालुक्यातील पोटा शेळके येथील एक रुग्ण कोरोनामुक्त झाला असून रुग्ण संख्या ७७ वर पोहचली आहे.
मुंबई वरून हिंगोली शहरात मंगळवारी परतलेला एका ४० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली असून तर दुसरीकडे औंढा तालुक्यातील पोटा शेळके येथील रुग्ण बरा होऊन घरी परतल्याने सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित ७७ रुग्णावर सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्तींना कोरोना सेंटर येथे दाखल करून उपचार सुरू आहेत. यामध्ये कळमनुरी८,सेनगाव १२, हिंगोली २९, वसमत बारा, असे एकूण६५ रुग्णावर उपचार सुरु आहेत. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथील आयसो लेशन वॉर्डात एकूण सोळा रुग्ण भरती आहेत. यामध्ये पाच औंढा, एक सुरजखेडा, समुदाय आरोग्य अधिकारी एक, चार पहेनी, एक माझोड, एक चोंढी, दोन बाराशिव, एक रिसाला बाजार आदींचा समावेश असून या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. कोणतेही गंभीर लक्षणे नसल्याचे उपचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालयातसह ,कोरोना केअर सेंटर येथे भरती करण्यात आलेल्या रुग्णामध्ये २३४८ रुग्णांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी २००७ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर यातील १९५५ रुग्णांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. आजमितीला ३८१ जणांचे अहवाल प्रयोग शाळेकडे प्रलंबित आहेत. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह १८३ रुग्णापैकी १०६ रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतल्याने आजघडीला एकूण ७७ रुग्णावर उपचार सुरु असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले. त्यामुळे मंगळवारी कही खुशी कही गम अशी काहीशी परिस्थिती दिसून येत होती.
जिल्ह्यात मुंबई,पुणे येथून परतणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने जिल्हा प्रशासनाची चांगलीच डोके दुःखी वाढली आहे. त्यामुळे मुंबई वरून परतणाऱ्या लोंढ्याना कसे रोखता येईल याकडे आरोग्य विभागासह ग्रामपंचायत पातळीवरील कृती शीघ्र दलासमोर मोठे आव्हान उभे टाकले आहे. जर असेच नागरिक मुंबई, पुणे येथून जिल्ह्यात परत असतील तर आणखी काही दिवसात पॉझिटिव्ह रुग्णाची आकडेवारी पाचशेच्या वर जाऊ शकते. त्यामुळे आरोग्य विभाग व ग्रामपंचायत स्तरावर कुठेही मोठे प्रयत्न सुरु नाहीत. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातील येणारी रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे.याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.