औंढा येथील एकाला कोरोनाची लागण ,तर दोन रुग्ण निगेटिव्ह
औंढा येथील एकाला कोरोनाची लागण ,तर दोन रुग्ण निगेटिव्ह
रुग्ण संख्या पोहचली २९ वर
हिंगोली - सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या औंढा तालुक्यातील दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांचे निगेटिव्ह अहवाल शनिवारी प्राप्त झाले. तर औंढा येथील एका ३७ वर्षीय पुरुषाला औरंगाबाद येथे भरती केलेल्या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवालप्राप्त झाला आहे. त्यामुळे रुग्ण संख्या २९ वर गेली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास यांनी दिली.
शनिवारी सायंकाळी नऊच्या सुमारास प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात १९२ आढळून आले होते. त्यापैकी १६३ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. सद्य स्थितीला एकूण २९ रुग्णावर उपचार सुरु आहेत. कोरोना सेंटर वसमत येथे एकूण१४ रुग्ण दाखल असून यात हट्टा चार, गिरगाव दोन, अकोली एक, कुरुडवाडी एक, हयातनगर चार, कौठा एक, वसमत शहर एक, यांचा समावेश आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरु आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालय येथील आयसोलेशन वॉर्डात एकूण पंधरा रुग्ण दाखल आहेत यात सुरेगाव एक,नागेशवाडी एक, पहेनी दोन, चोंडी खुर्द दोन, बाराशिव दोन, रिसाला तीन, नगर परिषद कॉलनी हिंगोली चार,यांचा समावेश असून यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत २१४६ व्यक्तींना भरती करण्यात आले होते. त्यापैकी २१२० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.२१७५ व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे. सद्यस्थितीला २६३ व्यक्ती भरती असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.तर १०५ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.