हिंगोली : मारहाण प्रकरणात अंतुलेनगरच्या मुख्याध्यापिका निलंबित
मारहाण प्रकरणात अंतुलेनगरच्या मुख्याध्यापिका निलंबित
मारहाण प्रकरण भोवले
,सीईओनी काढले निलंबनाचे आदेश
हिंगोली - अंतुलेनगर येथील जिल्हा परिषद शाळेतील दिव्यांग प्राथमिक पदवीधर शिक्षकास मारहाण प्रकरणात याच शाळेतील मुख्याध्यापिकेस सीईओ शर्मा यांनी निलंबित केल्याचे आदेश शुक्रवारी (ता.१९) काढले असून तसे शिक्षण विभागाला काळविले आहे.त्यामुळे हे प्रकरण
मुख्याध्यापिकेच्या चांगलेच अंगलट आले आहे.
येथील दिव्यांग प्राथमिक पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर ठाकरे हे (ता.१) ओक्तोम्बर रोजी शाळेत कार्यरत असताना याच शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती वसुधा नामदेवराव कानडे यांनी फोन करून त्यांचा मुलगा व इतर बाहेरील व्यक्तींना शाळेत बोलावून ठाकरे यांना जबर मारहाण केली होती. त्यामुळे हे प्रकरण विभागीय आयुक्त कार्यालया पर्यंत धडकले .या प्रकरणाची विभागीय आयुक्ताने शिक्षण विभागाला करण्याचे काळविले होते.त्यानुसार हिंगोली गट शिक्षणअधिकारी यांनी तसा अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर केला होता.
त्यानुसार मुख्याध्यापिकेने शालेय शैक्षणिक दृष्ट्या पदास न शोभणारे अशोभनीय गैर वर्तन केल्याने जिल्हा परिषद सेवा वर्तणूक नियम (१९६७ )चे नियम तीन चा भंग केल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबीनोद शर्मा यांनी आपल्या अखत्यारीत येत असलेल्या अधिकाराचा वापर करीत अंतुलेनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वसुधा कानडे यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम१९६४ चे नियम (३) प्रमाणे शुक्रवार( ता.१९) पासून निलंबित केले आहे.
निलंबन काळात कळमनुरी पंचायत समिती येथे राहावे लागेल. तसेच आपणास पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे बजावले आहे.निलंबन काळात कोणताही खाजगी व्यवसाय अथवा नोकरी करता येणार नाही.तसे आढळून आल्यास कारवाईस पात्र ठरतील. असे आदेशात नमूद केले आहे.