पहिल्याच मुसळधार पावसात सेनगाव ते नर्सी रोड वरील पूल गेला वाहून


पहिल्याच मुसळधार पावसात सेनगाव ते नर्सी रोड वरील पूल गेला वाहून


सेनगाव तालुक्याचा संपर्क तुटला, पाच तास वाहतूक ठप्प


सेनगाव -   तालुक्यात रविवारी सकाळपासून पावसाने आपली दमदार हजेरी लावल्याने  नदी-नाले तुडुंब भरून वाहत होते . पहिल्याच मुसळधार पावसाने सेनगाव ते नर्सी या रस्त्यावरील वळण रस्ता वाहून गेल्याने सुमारे पाच ते सहा तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने सेनगाव तालुक्याचा संपर्क तुटला होता.


तालुक्यात पावसाने आपली दमदार इंट्री मारून शेतकर्‍यात समाधानाचे वातावरण निर्माण केले आहे .रविवारी  सकाळपासूनच पावसाने आपली सुरुवात दमदार स्वरूपात केली होती. आज दिवसभर पावसाने आपला मुक्काम ठेवत धो धो बरसत होता. त्यामुळे सेनगाव नर्सी रोडवरील पर्यायी पूल पूर्णता वाहून गेल्याने तालुक्यांचा जिल्ह्याशी  संपर्क तुटल्यास कारणीभूत ठरला आहे.


 सेनगाव ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक  महिन्यापासून चालू आहे ते काम पूर्णत्वास जाण्याच्या वाटेवर असताना महामार्गावरील नव्याने पूल काढण्याचे काम बाकी आहे. नर्सी नामदेव येथील गावाजवळील नवीन पुलाचे बांधकाम चालू असताना शिवालया कन्ट्रक्शन लिमिटेड या कंपनीकडून राष्ट्रीय महामार्गाची व त्या मार्गावरील पुलांचे बांधकाम चालू आहे. राष्ट्रीय महामार्ग 461 बी असून या राष्ट्रीय महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे .काही ठिकाणी पूल बांधण्याचे काम बाकी आहे .नर्सी नामदेव येथील फूलाचे बांधकाम चालू असल्याने प्रवासी व वाहनधारकांना कंपनीकडून पर्यायी मार्ग व पूल निर्माण केला होता. परंतु आज झालेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून जात असताना त्यामध्ये हा पर्यायी पूल पूर्णता वाहून गेला व त्यामध्ये फार मोठे भगदाड पडले असल्याचे पहावयास मिळत आहे .त्यामुळे सेनगाव हिंगोली या तालुक्यांच्या ठिकाणच्या जिल्ह्याशी असलेल्‍या संपर्क तुटला आहे .तर वाहन धारकांना ये जा करण्यास फार मोठी अडचण निर्माण झाल्याने काही काळ वाहतुकीस खोळंबा व अडचणीचा सामना करावा लागला. राष्ट्रीय महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण करून नव्याने निर्माण होत असलेले पूल लवकर निर्माण करावे तालुक्याचा जिल्ह्याची असलेला संपर्क कायम ठेवण्यासाठी  कंपनीने तात्काळ रस्ता रहदारी निर्माण करावा अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे. अन्यथा पावसाळ्याचे दिवस चालू झाले असून प्रतिदिन अशा गंभीर स्वरूपाच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी भाग पडणार हे मात्र नक्की.रस्ता निर्मितीचे काम संथगतीने सुरु असून या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा