हिंगोलीत आणखी अकरा कोरोना पॉझिटिव्ह नऊ रुग्ण निगेटिव्ह
हिंगोलीत आणखी अकरा कोरोना पॉझिटिव्ह नऊ रुग्ण निगेटिव्ह
रुग्ण संख्या पोहचली २८ वर ,रुग्ण संख्येचा आलेख होतोय चढ उतार
हिंगोली - सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात भरती
केलेले दोन रुग्ण तसेच औरंगाबाद येथे भरती केलेला रुग्ण शिवाय वसमत येथील आठ असे मिळून एकूण अकरा रुग्ण बुधवारी ठणठणीत बरे झाल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. तर आज नव्याने नऊ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने रुग्ण संख्या आता २८ वर गेली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किशोर प्रसाद श्रीवास यांनी सांगितले.
दरम्यान, हिंगोली आयसोलेशन वॉर्डातील दोन, औंढा येथील एक, तसेच वसमत कोरोना सेंटर येथील आठ असे अकरा रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. यात हट्टा दोन, गिरगाव दोन, कुरुडवाडी एक, हयातनगर एक, औंढा एक, वसमत शहर एक अश्या नऊ व हिंगोली दोन, औंढा एक असे मिळून अकरा रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.आज रोजी एकूण अकरा कोरोना रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे आता२८ कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत.
शहरातील लिंबाळा कोरोना केअर सेंटर मधील नऊ रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याचे अहवालावरून स्पस्ट झाले आहे. हे सर्व जण मुंबई वरून हिंगोली जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यात कालगाव सहा , शिरसम बुद्रुक एक, ब्राह्माण वाडा एक, सुकळी वळण एक यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांनी २१० चा आकडा पार केला होता. त्यापैकी १८२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला एकूण २८ रुग्णावर उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात विविध ठिकाणी भरती केलेल्या हयातनगर येथील तीन रुग्णावर उपचार सुरु असून या सर्वांची प्रकृती ठणठणीत असून कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार करण्यात येत असलेल्या रुग्णामध्ये एकूण १५ रुग्ण आहेत.यात सुरेगाव एक, चोंढी खुर्द पाच, सेनगाव तीन,दोन रिसाला,नगर परिषद हिंगोली चार, अश्या१५ रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यन्त जिल्ह्यातील कोविड सेंटर येथे २६३७ रुग्णांना भरती करण्यात आले आहे.त्यापैकी २२०१ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.तर २३३१ रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून,सद्य स्थितीला ३९७ रुग्ण भरती आहेत .१९५ रुग्णाचे अहवाल प्रलंबित असल्याचे सांगितले.