कळमनुरीत नव्याने एका २२ वर्षीय युवकाला कोरोची लागण तर पाच रुग्ण निगेटिव्ह
कळमनुरीत नव्याने एका २२ वर्षीय युवकाला कोरोची लागण तर पाच रुग्ण निगेटिव्ह
रुग्ण संख्या पोहचली ३३ वर
हिंगोली - कळमनुरी येथे क्वारंटाइन केलेल्या एका नव्याने २२ वर्षीय पुरुषाला सोमवारी कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असून, वसमत व हिंगोली येथील भरती केलेले पाच रुग्ण निगिटिव्ह आल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. त्यामुळे रुग्ण संख्या ३३ वर गेली आहे.
वसमत क्वारंटाइन सेंटर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी अकोली एक व हट्टा दोन असे तीन रुग्ण बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. तर सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात भरती केलेल्या दोन रुग्णांना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. यामध्ये रिसाला बाजार, व चोंढी खुर्द रुग्णाचा समावेश आहे.
कळमनुरी येथे मुंबई वरून परतलेल्या एकाला क्वारंटाइन सेंटर येथे २२ वर्षीय पुरुषाला भरती केले होते.त्याला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला असल्याने कोरोना मुक्त झालेला कळमनुरी तालुका पुन्हा डोके वर काढला आहे. सोमवारी पाच रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर कळमनुरी तालुक्यात एकाला लागण झाली आहे.
आतापार्यंत जिल्ह्यात कोरोनाचे २०१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १६८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली. तर आजघडीला ३३ रुग्णावर कोरोना सेंटर येथे उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी भरती केलेल्या रुग्णात यामध्ये हट्टा दोन, गिरगाव दोन, कुरुडवाडी एक, हयातनगर चार,कौठा एक,वसमत शहर एक,अश्या एकूण११ रुग्णाचा समावेश आहे.या सर्वांची प्रकृती ठणठणीत असून कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार करण्यात येत असलेल्या रुग्णामध्ये एकूण२१ रुग्ण आहेत.यात सुरेगाव एक, नागेशवाडी एक, पहेनी दोन, चोंढी खुर्द पाच,बाराशिव दोन,सेनगाव तीन,दोन रिसाला,नगर परिषद हिंगोली चार, औरंगाबाद हॉस्पिटल एक अश्या२१ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यन्त जिल्ह्यातील कोविड सेंटर येथे २५९५ रुग्णांना भरती करण्यात आले आहे.त्यापैकी २१४४ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.तर२१९३ रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून,सद्य स्थितीला२८४ रुग्ण भरती आहेत .१६५ रुग्णाचे अहवाल प्रलंबित असल्याचे सांगितले.