दिलासा ; हिंगोलीत नऊ रुग्णाची कोरोनावर मात
दिलासा ; हिंगोलीत नऊ रुग्णाची कोरोनावर मात
२८ कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू
हिंगोली - शनिवारी प्राप्त अहवालानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डातील कोरोना चे नऊ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये कालगाव सहा, सिरसम एक, ब्राह्मणवाडा एक, सुकळी एक, या रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या२३८ झाली असून यातील२१० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजघडीला केवळ जिल्ह्यात२८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु असल्याने जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधित असलेल्या रुग्णावर कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये वसमत चार रुग्ण असून कुरेशी मोहला एक, बुधवार पेठ एक, अशोक नगर एक, मुरुम्बा एक यांचा समावेश आहे. तसेच कळमनुरी केअर सेंटर येथे एकूण पाच रुग्णावर उपचार सुरू आहेत. यामध्ये दाती तीन, डोंगरकडा एक, टव्हा एक, यांचा समावेश आहे. या रुग्णाची प्रकृती स्थिर असून कोणतेही गंभीर लक्षणे नाहीत. याशिवाय कोरोना केअर सेंटर लिंबाळा अंतर्गत दोन रुग्ण भरती केले असून यात कनेरगाव एक, संतुक पिंपरी एक यांचा समावेश आहे. तसेच कळमनुरी येथील डेडीकेटेड रुग्णालयात तीन रुग्णावर उपचार सुरू आहेत. यात एसआरपीएफ जवान, उपचारा साठी भरती असून एकाला विशेष काळजी म्हणून औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात एकूण बारा रुग्णावर उपचार सुरु आहेत. यामध्ये भगवती तीन,खानापूर एक,पेन्शन पुरा चार,भोईपुरा एक ,कमलानगर एक,सम्राटनगर एक, जवळा बाजार एक यांचा समावेश आहे.सद्य स्थितीला कोणतेही लक्षणे नसून तज्ञा मार्फत उपचार सुरू आहेत.तसेच सेनगाव येथील कोरोना सेंटर येथे एकावर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत आयसोलेशन वॉर्ड व कोरोना सेंटर मध्ये एकूण२९७८ रुग्णांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी२६८२ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.२४८५ रुग्णांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. तर ४८१ रुग्ण भरती असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.१२७ रुग्णांचे अहवाल प्रयोग शाळेकडे प्रलंबित असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यातरंगत प्रत्येक तालुक्यात विविध गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वॉरंटाईन सेंटर अंतर्गत आज पर्यत ४०१५ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे. ३६०३ व्यक्तीचा स्वॅब अहवाल निगेटीव्ह आला आहे.३२६९ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्या ७३२ व्यक्ती भरती आहेत. तर २१८ अहवाल प्रलंबीत असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.