दिलासा; हिंगोलीत सहा जणांनी केली कोरोनावर

 


दिलासा; हिंगोलीत सहा जणांनी केली कोरोनावर  मात 


बाधीत रुग्णसंख्या पोहचली ३६ वर


हिंगोली -   येथील जिल्‍हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डातील सहा रुग्ण बरे झाल्याने त्‍यांना सोमवार (ता.15) डिस्‍चार्ज देण्यात आला असून यात दोन रिसाला बाजार येथील रुग्णांचा समावेश आहे. सध्या 36 रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली. 


आजपर्यत कोरोनाची लागण झालेले व उपचारासाठी कोरोना केअर सेंटर वसमत मध्ये दोन रुग्ण आहेत यात एक कुरेशी मोहल्‍ला, एक अशोकनगर येथील रहिवासी आहेत. ते उपचारासाठी भरती आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्‍थीर असून कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. कळमनुरी येथील कोरोना सेंटर येथे पाच कोरोना रुग्ण आहेत यात जाम येथील एक, दाती तीन, तर एक डोंगरकडा येथील आहे. ते उपचारासाठी भरती असून त्‍यांची प्रकृती स्‍थीर आहे.  


डेडीकेट कोविड हेल्‍थ सेंटर कळमनुरी येथे एक कोरोनाचा रुग्ण असून तो एसआरपीएफ जवान आहे. जो उपचारासाठी भरती होता त्‍याला विशेष काळजी म्‍हणून औरंगाबाद येथील धूत हॉस्‍पीटल मध्ये संदर्भीत करण्यात आले आहे. जिल्‍हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात 28 कोरोना रुग्ण आहेत यात चोंढी खुर्द पाच, सेनगाव तीन, भगवती तीन, कलगाव सहा, सिरसम बुद्रुक एक, ब्राम्‍हणवाडा एक, सुकळी वळण एक, खानापूर एक, पेन्शनपुरा चार, भोईपुरा एक, कमलानगर एक, वसमत येथील सम्राटनगर येथील एकाचा समावेश आहे. ते उपचारासाठी भरती आहेत. त्‍यांची प्रकृती स्‍थीर आहे त्‍यांच्यावर तज्ञ वैद्यकिय टिम मार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. 


जिल्‍ह्‍यात प्रत्‍येक तालुक्‍यातंर्गत तयार करण्यात आलेल्या क्‍वारंटाईन सेंटरमध्ये आजपर्यत 744 व्यक्‍तीना भरती करण्यात आले आहे. 709 व्यक्‍तीचा स्‍वॅब अहलवाल निगेटीव्ह आला आहे. 532 व्यक्‍तींना डिस्‍चार्ज देण्यात आले आहेत. सद्यस्‍थीतीत 212 व्यक्‍ती भरती आहेत. आज रोजी 35 अहवाल येथे बाकी आहेत. आतापर्यत आयसोलेशन वार्ड व सर्व कोरोना सेंटरमध्ये  एकूण 2879 व्यक्‍तींना भरती करण्यात आले होते त्‍यापैकी 2361 व्यक्‍तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 2386 व्यक्‍तींना डिस्‍चार्ज दिला असून सद्यस्‍थीतीत 464 व्यक्‍ती भरती आहेत. तर 190 अहवाल येणे प्रलंबीत आहेत. 


जिल्‍ह्‍यातंर्गत आयोसोलेशन वार्ड सर्व कोरोना सेंटर व गावपातळीवरील क्‍वारंटाईन सेंटर अंतर्गत 3623 व्यक्‍तीनी भरती भरती करण्यात आले आहे. त्‍यापैकी 3070 व्यक्‍तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 2918 व्यक्‍तींना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. सध्या 676 व्यक्‍ती भरती आहेत. तर आज रोजी 225 अहवाल येणे प्रलंबीत असल्याची माहिती डॉ. श्रीवास यांनी दिली.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा