चिंताजनक ; हिंगोलीत पुन्हा चार रुग्ण कोरोना बाधीत, एकाला सुट्टी 

चिंताजनक ; हिंगोलीत पुन्हा चार रुग्ण कोरोना बाधीत, एकाला सुट्टी 


आता रुग्ण संख्या पोहचली३६ वर


हिंगोली -  तालुक्‍यातील लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटर येथील दोन व्यक्‍ती, वसमत येथील २४  वर्षीय पुरुष राज्यराखीव पोलीस दलातील एक जवान असे चौंघेजण गुरूवारी (ता.18) कोरोना बाधीत झाले असून कळमनुरी येथील एकाला डिस्‍चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली आहे. आता जिल्‍ह्‍या एकूण रुग्ण संख्या 36 आहे.   


आज रोजी प्राप्त अहवालनुसार कोरोना केअर सेंटर लिंबाळा येथील दोन व्यक्‍तींना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातुन स्‍पष्ट झाले आहे. यातील एक रुग्ण 23 वर्षीय पुरुष असून तो संतुकपिंपरी येथील रहिवासी आहे. तो मुंबई येथून हिंगोली तालुक्‍यात आलेला आहे. तर दुसरा रुग्ण 14 वर्षीय मुलगा असून कनेरगाव नाका येथील रहिवासी आहे आणि तो मुंबई मधुन हिंगाली तालुक्‍यात आलेला आहे. दोन्हीही रुग्ण आल्यापासून क्‍वारंटाईन सेंटर मध्ये भरती आहेत. 


आज प्राप्त अहवालानुसार वसमत येथील क्‍वारंटाईन सेंटर अंतर्गत 24 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे स्‍पष्ट झाले आहे. हा पुरूष बुधवारपेठ भागातील रहिवासी असून तो मुंबई मधून वसमत तालुक्‍यात आलेला आहे. तो आल्यापासून क्‍वारंटाईन सेंटर मध्ये भरती आहे. तसेच हिंगोली येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक बारा येथील एका जवानाला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्‍पष्ट झाले आहे. सदरीत जवान मुंबई मधून हिंगोली जिल्‍ह्‍यात आलेला आहे. आणी एस.एस. बी. येलकी येथील क्‍वॉरंटाईन सेंटर मध्ये भरती होता. त्‍याला पुढील उपचारासाठी डेडिकेटेदड कोविड हेल्‍थ सेंटर कळमनुरी येथे भरती करण्यात आले आहे. 


कोरोना केअर सेंटर कळमनुरी अंतर्गत एक रुग्ण बरा झाल्याने त्‍याला डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. सदरील रुग्ण जाम येथील रहिवासी आहे. आज जिल्‍ह्‍यात प्राप्त झालेल्या अहवालानुसार चार नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत व एक रुग्ण बरा झाल्याने त्‍याला डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्‍थितीत जिल्‍ह्‍यात एकूण 237 रुग्ण झाले आहेत. त्‍यापैकी 201 रुग्ण बरे झाल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. सध्या 36 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 


 हिंगोली जिल्‍ह्‍यात कोरोनाची लागण झालेले व उपचारासाठी कोरोना केअर सेंटर वसमत येथे एकूण चार रुग्ण आहेत त्यात एक कुरेशी मोहल्‍ला, एक बुधवारपेठ, एक अशोकनगर, एक मुरुंबा येथील रहिवासी आहेत ते उपचारासाठी भरती आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्‍थीर असून कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथे एकूण पाच कोरोना रुग्ण आहेत यात तीन दाती येथील, एक डोंगरकडा, एक टव्हा येथील रहिवासी आहेत. ते उपचारासाठी भरती झाले आहेत. या  सर्व रुग्णांची प्रकृती स्‍थीर असून कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. 


डेडिकेटेड कोविड हेल्‍थ सेंटर कळमनुरी येथे 3  कोरोना रुग्ण असून ते एसआरपीएफ जवान भरती आहेत. व एका जवानांला विशेष काळजी म्‍हणून औरंगाबाद येथील धुत हॉस्‍पीटल येथे संदर्भीत करण्यात आले आहे. हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णांलयातील आयसोलेशन वार्डात एकूण 21 रुग्ण आहेत यात तीन भगवती, सहा कलगाव, एक सिरसम बुद्रुक, एक ब्राम्‍हणवाडा. एक सुकळी वळण, एक खानापूर, चार पेन्शनपुरा, एक भोईपुरा, एक कमलानगर, एक सम्राटनगर वसमत, एक जवळा बाजार यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते उपचारासाठी भरती आहेत. त्यांची प्रकृती स्‍थीर असून सद्यस्‍थितीत कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. त्‍यांच्यावर तज्ञ वैद्यकिय टिम मार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. 


हिंगोली जिल्‍ह्‍यातंगृत प्रत्‍येक तालुक्‍यात विविध गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्‍वॉरंटाईन सेंटर अंतर्गत आज पर्यत 950 व्यक्‍तींना भरती करण्यात आले आहे. 808 व्यक्‍तीचा स्‍वॅब अहवाल निगेटीव्ह आला आहे. 722 व्यक्‍तींना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. सद्या 227 व्यक्‍ती भरती आहेत. तर 141 अहवाल प्रलंबीत आहेत. आतापर्यत आयसोलेशन वार्ड व जिल्‍ह्‍यात सर्व कोरोना सेंटरमध्ये 2926  व्यक्‍तींना भरती करण्यात आले होते. त्‍यापैकी 2658 व्यक्‍तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 2480 व्यक्तींना डिस्‍चार्ज दिला असून सद्यस्‍थितीत 425 व्यक्‍ती भरती आहेत. तर 89 अहवाल प्रलंबीत आहेत. 


हिंगोली जिल्‍ह्‍यातंर्गत आयसोलेशन वार्ड व जिल्‍ह्‍यात सर्व कोरोना सेंटर व गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्‍वॉरंटाईन सेंटर अंतर्गत एकूण 3876 व्यक्‍तींना भरती करण्यात आले आहे. त्‍यापैकी 3436 व्यक्‍तीचे अहवाल निगेटीव्ह  आले आहेत.  3202 व्यक्‍तींना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. सध्या 652 व्यक्‍ती भरती आहेत तर 230 अहवाल प्रलंबीत असल्याची माहिती डॉ. श्रीवास यांनी दिली.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा