हिंगोलीत राष्ट्रवादीकडून जोडेमारो आंदोलन
हिंगोलीत राष्ट्रवादीकडून जोडेमारो आंदोलन
आमदार पडळकरांनी केलेल्या जाहीर वक्तव्याचा निषेध
हिंगोली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यावर महाराष्ट्राला झालेला कोरोना अशी जहरी टीका पडळकर यांनी करून राज्यात मोठा वाद निर्माण केल्याने गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली येथे गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पोस्टारला जोडेमारो आंदोलन करून घोषणाबाजी करीत जाहीर निषेध राष्ट्रवादीकडून व्यक्त करण्यात आला.
भाजपकडून नुकतेच विधानपारिषदेवर आमदार म्हणून निवडून आलेले गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका करीत शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना असल्याचे वादग्रस्त विधान केले तसेच धनगर समाजाच्या अरक्षणावरून महाविकास आघाडीला लक्ष करीत शरद पवार यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.पडळकर यांच्या ववक्तव्याचा जाहीर निषेध करून येथील गांधी चौकात गुरुवारी (ता.२५)प्रतिकात्मक पोस्टारला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, बालाजी घुगे, बी.डी.बांगर, माधव कोरडे, कमलेश यादव, अमित काळासरे, इरु पठाण, केशव शांकट ,केदार डांगे, भाऊराव डांगे, दत्तराव नवघरे, इमाम बेलदार,उत्तम कऱ्हाळे ,संतोष भालेराव, सचिन गुंडेवार, अशोक पाटील, पांडुरंग नरवाडे, बबन बोचरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्या कडून गोप्याचे करायचे काय, खाली मुंडक वर पाय, माफी मागा पडळकर माफी मागा अशा प्रचंड घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. गोपीचंद पडळकर यांनी माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलीप चव्हाण यांनी दिला आहे.