शंकर बरगे यांचे स्वागत तर जगदीश मिणियार यांना निरोप
शंकर बरगे यांचे स्वागत तर जगदीश मिणियार यांना निरोप
हिंगोली - तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांची पदोन्नती झाल्याने त्यांच्या जागी नुतन अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे यांनी पदभार स्विकारल्याने त्यांचे स्वागत करून श्री. मिणीयार यांना सोमवारी (ता.8) जिल्हाधिकारी कार्यालयात निरोप देण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, माजी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांच्या सुविद्य पत्नी उज्ज्वला मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार, उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी, प्रशांत खेडेकर आणि अतुल चोरमारे, मुख्याधिकारी रामदास पाटील, सर्व तहसीलदार यांच्यासह तसेच जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
नुतन अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे म्हणाले की, मराठवाड्यात काम करण्याची मला पहिल्यांदाच संधी प्राप्त झाली असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या कालावधीत आपणा सर्वांसमोर अनेक आव्हाने आहेत. यासाठी जिल्ह्यात सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्या सहकार्याने काम करुन आपण प्रगतीचा वेग असाच कायम ठेवू.
तर श्री. मिणियार म्हणाले की, या जिल्ह्यात काम करण्याचा पूर्वीचा अनुभव आणि मला लाभलेल्या उत्तम सहकाऱ्यांमुळे चांगले काम करता आले. शासकीय योजनांची अंमलबजावणी या सर्व कामांमध्ये मला चांगले अनुभव आले. यावेळी विविध विभागप्रमुख व यंत्रणा प्रमुखांनी मिणियार यांचा सपत्नीक सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचलन अकुंश सोनटक्के यांनी केले. तर नायब तहसीलदार राजेंद्र गळगे यांनी आभार मानले.