हिंगोली : विलाज सुरू असताना प्रसुती केली नसल्याची तक्रार
विलाज सुरू असताना प्रसुती केली नसल्याची तक्रार
हिंगोली - शहरातील आझम कॉलनी येथील गर्भवती महिलेला एका रुग्णालयात विलाज सुरू असताना प्रसुतीसाठी नकार दिल्याबद्दल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे सोमवारी (ता.1) करण्यात आली आहे.
या बाबत अशरदखान कलरदखान पठाण यांनी दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, माझ्या भावाची पत्नी मसरुतजहॉ अमजतखान पठाण या गरोदर असल्याने त्यांचा नियमित विलाज शहरातील एका खाजगी रुग्णालयात सुरू होता दर महिण्याला तेथे तपासणी केली जात होती. त्यांनतर कोरोनाचा प्रसार झाल्यामुळे दवाखान्यात डॉक्टराना हजर राहण्याचे शासन आदेश असतानाही त्यांनी माझ्या वहिणीची प्रसुतीची वेळ आल्यानंतर दवाखान्यात भरती केले नाही. त्यामुळे या बाबत योग्य ती चौकशी करून संबधीतावर दंडात्मक कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.