मुंबई नंतर आता पुणे कनेक्शन ; वसमत तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा
मुंबई नंतर आता पुणे कनेक्शन ; वसमत तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा
बाधीत रुग्णसंख्या पोहचली ३७ वर
हिंगोली - पुण्यातून वसमत तालुक्यात परतलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल मंगळवारी (ता.१६) जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे प्राप्त झाला आहे. हा रुग्ण तालुक्यातील मुरुम्बा गावातील रहिवाशी असून त्यास आल्यानंतर क्वारंटाइन सेंटर मध्ये उपचार सुरु असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किशोर प्रसाद श्रीनिवास यांनी सांगितले.
आतापर्यन्त जिल्ह्यात २२९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १९२ रुग्णावर उपचार केल्याने त्यांची प्रकृती ठणठणीत बरी झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला एकूण ३७ रुग्णावर उपचार सुरू आहेत.
आजपर्यत कोरोनाची लागण झालेले व उपचारासाठी कोरोना केअर सेंटर वसमत मध्ये तीन रुग्ण आहेत. यात एक कुरेशी मोहल्ला, एक अशोकनगर,व मुरुम्बा एक येथील रहिवासी आहेत. ते उपचारासाठी भरती आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थीर असून कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. कळमनुरी येथील कोरोना सेंटर येथे पाच कोरोना रुग्ण आहेत .यात जाम येथील एक, दाती तीन, तर एक डोंगरकडा येथील आहे. ते उपचारासाठी भरती असून त्यांची प्रकृती स्थीर आहे.
डेडीकेट कोविड हेल्थ सेंटर कळमनुरी येथे एक कोरोनाचा रुग्ण असून तो एसआरपीएफ जवान आहे. जो उपचारासाठी भरती होता त्याला विशेष काळजी म्हणून औरंगाबाद येथील धूत हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात २८ कोरोना रुग्ण आहेत यात चोंढी खुर्द पाच, सेनगाव तीन, भगवती तीन, कलगाव सहा, सिरसम बुद्रुक एक, ब्राम्हणवाडा एक, सुकळी वळण एक, खानापूर एक, पेन्शनपुरा चार, भोईपुरा एक, कमलानगर एक, वसमत येथील सम्राटनगर येथील एकाचा समावेश आहे. ते उपचारासाठी भरती आहेत. त्यांची प्रकृती स्थीर आहे त्यांच्यावर तज्ञ वैद्यकिय टिम मार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत.
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातंर्गत तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आजपर्यत ८३० व्यक्तीना भरती करण्यात आले आहे. ७२३ व्यक्तीचा स्वॅब अहलवाल निगेटीव्ह आला आहे. ५४५ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आले आहेत. सद्यस्थीतीत २८५ व्यक्ती भरती आहेत. आज रोजी ७९ अहवाल येणे प्रलंबित आहेत.
आतापर्यत आयसोलेशन वार्ड व सर्व कोरोना सेंटरमध्ये एकूण २८९७ व्यक्तींना भरती करण्यात आले होते. त्यापैकी २३८५ व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. २३९६ व्यक्तींना डिस्चार्ज दिला असून सद्यस्थीतीत ४७२ व्यक्ती भरती आहेत. तर १७१ अहवाल येणे प्रलंबीत आहेत.
जिल्ह्यातंर्गत आयोसोलेशन वार्ड सर्व कोरोना सेंटर व गावपातळीवरील क्वारंटाईन सेंटर अंतर्गत ३७२७ व्यक्तीनी भरती भरती करण्यात आले आहे. त्यापैकी ३१०८ व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. २९४१ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ७५७ व्यक्ती भरती आहेत. तर आज रोजी २५० अहवाल येणे प्रलंबीत असल्याची माहिती डॉ. श्रीवास यांनी दिली.