घोळवा येथील ७१ वर्षीय पुरुषाचा हैदराबादेत मृत्यू संपर्कातील ३२ जणांना केले क्वारंटाइन
घोळवा येथील ७१ वर्षीय पुरुषाचा हैदराबादेत मृत्यू
त्यांच्या संपर्कातील ३२ जणांना केले क्वारंटाइन
हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील घोळवा येथील एका ७१ वर्षीय पुरुषाला हैद्राबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.कोरोना आजाराने त्यांचा मृत्यू झाला.सदरील रुग्णास हृदयविकाराचा आजार होता. काही दिवस नांदेड येथे उपचार सुरु होते. त्यानंतर हैद्राबाद येथे भरती करण्यात आले होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला .मात्र त्यांच्या संपर्कातील३२ जणांना क्वारंटाइन करून त्यांचे थ्रोट स्वाब तपासणी साठी पाठविण्यात आल्याची माहिती डॉ श्रीवास यांनी दिली.
आतापर्यन्त जिल्ह्यात कोरोना विषाणू चे २७० रुग्ण झाले आहेत. त्यापैकी २३८ रुग्ण बरे झसल्यामुळे त्यांना घरी सुट्टी देण्यात आली. आजघडीला एकूण३२ रुग्णावर उपचार सुरु आहेत. तसेच वसमत येथील कोरोना सेंटर येथे दोन रुग्णावर उपचार सुरू आहेत. यामध्ये चंदगव्हाण एक, वसमत शहर एक यांचा समावेश आहे. याशिवाय कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटर येथे एकूण पंधरा रुग्णावर उपचार सुरु आहेत. यामध्ये काजी मोहल्ला सहा, कवडा सहा, गुंडलवाडी दोन, बाबळी एक यांचा समावेश असून त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नाहीत. तर डेडी केटेट कोविड सेंटर येथे दोघांवर उपचार सुरु आहेत. यात एक एसआरपीएफ जवान ,भोसी येथील एक यांचा समावेश आहे.
शहरातील लिंबाळा अंतर्गत कोविड सेंटर येथे सहा रुग्णावर उपचार सुरु आहेत. यात तालाब कट्टा दोन, रिसाला दोन, केंद्रा दोन, यांचा समावेश आहे. तर सेनगाव ययेथे पाच रुग्णावर तर औंढा येथे दोन रुग्णावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आयसोलेशन वॉर्ड कोरोना सेंटर ,व गाव पातळीवर
क्वारंटाइन सेंटर मध्ये ४७११ रुग्णांना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी ४२१७ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.४१९१ रुग्णांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. सद्य स्थितीत५१२ व्यक्ती भरती असून२६० जणांचे थ्रोट अहवाल येणे बाकी आहे.