प्रवाशानो सावधान ,बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी ई पास बंधनकारक
प्रवाशानो सावधान ,बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी ई पास बंधनकारक
जिल्हाधिकारी जयवंशी यांनी काढले आदेश
हिंगोली - राज्यात, व इतर जिल्ह्यात लॉकडाऊन मुळे अडकून पडलेल्या प्रवाश्याना ई पास घेऊनच प्रवास करावा लागणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू केला आहे.त्यानुसार जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्हा हा इतर जिल्ह्याच्या मानाने कोरोना रुग्ण बरे होत असून आजपर्यंत एकही बळी गेला नाही.संपूर्ण जून महिना हा लॉक डाऊन असल्याने जिल्ह्यात सलून, बार, खानावळ आदी सोडून सर्व आस्थापणाना परवानगी दिली आहे.
यापूर्वी बाहेर जिल्ह्यात किंवा पर राज्यात प्रवास करण्यासाठी चालक, प्रवाश्याना केवळ वैद्यकीय दाखलाची गरज होती. आता ती रद्द करून प्रवाशी, चालकांना बाहेर प्रवास करण्यासाठी इच्छित स्थळी जाण्यासाठी अटी व शर्तीवर ई पास बंधनकारक करण्यात आले आहे.प्रवास करताना दोन चाकी वाहन केवळ एक व्यक्ती, तीन चाकी वाहन एक प्लस दोन, व चारचाकी वाहनांसाठी एक अधिक दोन परवानगी देण्यात आली आहे.तसेच प्रवास करताना प्रवासी व चालकास नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे. तसेच वाहनांमध्ये व इतर ठिकाणी शासनाच्या नियमानुसार सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. जर नियमांचे उल्लंघन केल्यास साथरोग प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिला आहे.