हिंगोली : रुग्ण संख्या पोहचली ७७ वर, मुंबई कनेकशन
मुंबई कनेक्शन ; हिंगोलीत आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर
हिंगोली - मुंबई हुन परतलेल्या सतरा वर्षीय पुरुषासह एका बारा वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल सोमवारी (ता.१)सायंकाळी पाचच्या सुमारास प्राप्त झाला असून,जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता ७७ वर पोहचली असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.
मुंबई वरून सोमवारी परतलेला एक १७ वर्षीय रुग्ण औंढा तालुक्यातील असून त्याच्यावर औंढा येथील कोरोना केअर सेंटर मध्ये भरती केले असून ,त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत. तर दुसरीकडे मुंबईहून वसमत येथे परतलेल्या एका१२ वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाल्याने तिला वसमत येथील क्वारंटाइन सेंटर मध्ये भरती करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
आतापर्यन्त जिल्ह्यात एकूण १८२ रुग्ण झाले असून त्यापैकी १०५ रुग्ण ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना घरी सुट्टी देण्यात आली. तर आजमितीला एकूण ७७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर कोरोना सेंटर येथे उपचार सुरु असल्याचे जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी सांगितले.
जिल्ह्यात मुंबई,पुणे येथून परतणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने जिल्हा प्रशासनाची डोके दुःखी वाढली आहे. त्यामुळे मुंबई वरून परतणाऱ्या लोंढ्याना कसे रोखता येईल याकडे आरोग्य विभागासह ग्रामपंचायत पातळीवरील कृती शीघ्र दलासमोर मोठे आव्हान उभे टाकले आहे. जर असेच नागरिक मुंबई, पुणे येथून जिल्ह्यात परत असतील तर आणखी काही दिवसात पॉझिटिव्ह रुग्णाची आकडेवारी पाचशेच्या वर जाऊ शकते. त्यामुळे आरोग्य विभाग व ग्रामपंचायत स्तरावर कुठेही मोठे प्रयत्न सुरु नाहीत. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातील येणारी रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे.