आजचे लातुर जिल्ह्यतील सर्व 28 पैकी  28 निगेटीव्ह

 


आजचे लातुर जिल्ह्यतील सर्व 28 पैकी  28 निगेटीव्ह   


विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 04.06.2020 रोजी लातुर जिल्हयातील एकुण 28 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 27 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी सर्वच 27   व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.


उपजिल्हा रुग्णालय, निलंगा येथुन एका व्यक्तींचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्या व्यक्तींचा अहवाल  निगेटीव्ह आला आहे.
 असे लातुर जिल्हयातील एकुण 28 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 28  व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले  आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


लातुर शहरातील काही रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह येत असुन त्यातील काही जणांना  कोणतीही लक्षणे नाहीत व इतर कोरोना प्रभावित शहरातुन प्रवास केलेला नाही तरीही काही व्यक्तींचे अहवाल अज्ञात पॉझिटीव्ह व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे पॉझिटीव्ह येत आहेत त्यामुळे सर्व नागरीकांनी सामाजिक अंतराचे पालन करावे, मास्कचा वापर करावा, वेळोवेळी सॅनिटायर्झ किंवा साबनाणे हात स्वच्छ धुवावे.  अतिमहत्वाच्या कामाशिवाय घरा बाहेर पडु नये.  जर ताप, खोकला, दम लागणे अशी लक्षणे आढळली असल्यास जवळील कोविड केअर सेंटर / रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी असे आवाहन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे यांनी केले.  
                            


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा